मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शिल्पा शेट्टीला तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी खास ओळखलं जातं. ती तिच्या सोशल मीडियावर व्यायामाचे पोस्ट शेअर करत असते. अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा कायम सोशल मीडियावर आपल्या फिटनेसचे व्हिडीओ टाकत असते. शिल्पाबद्दल सांगायचं झालं तर, ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. फिटनेसने अनेक व्हिडीओ आणि टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत ती सर्वांना फिट राहण्याचं अवाहनही करते..  तिनं अनेकदा योग साधनेमुळे तिचं आयुष्य कसं बदललं याविषयी माध्यमांना सांगितलं आहे. 47 वर्षांची असूनही शिल्पाचा फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टीने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच या अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला टक्कल दिसत आहेत. हे पाहून या अभिनेत्रीने अखेर असं का केलं असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर, काही लोक तिच्या या शैलीचे कौतुकही करत आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र व्हायरल होणारा हा व्हिडिओ जुना आहे. 


खरंतर शिल्पाने तिचे हे केस तिच्या नवऱ्यासाठी केले होते.  शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा तुरुंगात असताना शिल्पा शेट्टी हा हेअर कट कोणत्याही फॅशनमुळे नाही तर शिल्पाने तिच्या नवऱ्यासाठी केलेल्या नवसामुळे झाला होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


एका वृत्तानुसार, शिल्पा शेट्टीने वैष्णोदेवी येथे जाऊन नवस मागितला होता की, जर तिचा पती राज कुंद्राला पॉर्न प्रोडक्शन प्रकरणात जामीन मिळाला तर ती आपलं अर्धे केस कापेल.  अलीकडेच शिल्पा शेट्टीने तिचा अंडरकट शो करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता.  या व्हिडिओमध्ये शिल्पा जिममध्ये केस बांधताना दिसली होती, ज्यामध्ये तिचा हेअरकटही दिसत होता.


एका यूजरने लिहिले, 'खूपच क्यूट हेअरकट.' तर अजून एका युजरने लिहिलं की, 'तुमची हेअरस्टाईल सुपर आहे.' त्याचबरोबर काही यूजर्स शिल्पा शेट्टीच्या नवीन हेअरस्टाईलला नापसंतीही दर्शवत आहेत.