मुंबई : कन्नड अभिनेता नवीन कुमार गौडा उर्फ यश सध्या खूप चर्चेत आहे. नुकताच त्याचा प्रदर्शित झालेला KGF हा सिनेमा सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. कर्नाटकच्या या 'रॉकिंग स्टार'ने बॉलिवूडला देखील टक्कर दिली आहे. या सिनेमाने आतापर्यंत 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशने आपल्या अभिनयातून आणि डायलॉगमधून सगळ्यांनाच आपलं वेड लावलं आहे. यशने नुकताच आपला 33 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या या भरघोस यशामागे एक खडतर प्रवास आहे हा प्रवास जाणून घेऊया... 


1. यश आज जरी एक सुपरस्टार असला तरीही या अगोदरचं संपूर्ण आयुष्य हे त्याचं अगदी सामान्यांप्रमाणे होतं. यशचे वडिल KSRTC ट्रान्सपोर्ट सर्विसमध्ये बस चालक होते. आज यश करोडोंचा मालक आहे पण असं असलं तरीही त्याचे वडिल आजही सरकारी बस चालवत आहे. 


2. यशच्या अभिनयाचं सर्वच स्तरावरून कौतुक होतं. मात्र यश बॉलिवूडमधील नवाजु्द्दीन सिद्दीकीचा मोठा चाहता आहे. तसेच तो किंग खान शाहरूख खानला स्वतःचा आयडियल मानतो. 


3. यशची पत्नी देखील अभिनेत्री असून तिचं नाव राधिका पंडित आहे. यशने टीव्ही मालिका 'नंदा गोकुला'पासून आपल्या अभिनयाला सुरूवात केली आहे. ज्या मालिकेत राधिका देखील होती. यानंतर यशने आपला दुसरा सिनेमा 'मोगिना मानासू' मध्ये राधिकासोबत काम केलं आहे. काम करतानाच हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले पण अनेक वर्ष ही गोष्ट एकमेकांपासून लपवून ठेवली. 



4. यश आणि राधिकाने गोव्यात गुपचूप साखरपुडा केला असून बंगलुरूमध्ये लग्न केलं. महत्वाची बाब ही आहे की, यशने आपल्या रिसेप्शनला संपूर्ण कर्नाटकच्या जनतेला आमंत्रण दिलं होतं. 


5. 2017 मध्ये राधिका आणि यशने 'यश मार्ग'नावाची संस्था सुरू केली ज्यामार्फत ते समाजसेवा करतात. कर्नाटकच्या दुष्काळग्रस्त कोप्पाल जिल्ह्यात यश या संस्थेने 4 करोड रुपये खर्च करून गावकऱ्यांना पाणी मिळवून दिलं आहे.