`बधाई हो`! यंदाच्या IFFIमध्ये `या` चित्रपटांचीही वर्णी
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया अर्थात `इफ्फि`चं यंदाचं हे ५०वं वर्ष
मुंबई : यंदाच्या वर्षी ५०व्या इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन २० ते २८ नोव्हेंबर या दिवसांमध्ये करण्यात आलं आहे. गोव्यात हा सोहळा पार प़डणार आहे, जेथे जवळपास २०० चित्रपटांचं स्क्रीनिंग करण्याची रुपरेषा आखण्यात आली आहे.
केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये विविध भारतीय भाषांचे २६ फिचर फिल्म आणि जवळपास ५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचंही प्रदर्शन या महोत्सवात करण्यात येणार आहे.
५० वर्षांपूर्वी साकारण्यात आलेल्या १२ चित्रपटांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी रशियाला या सोहळ्यातील साथीदार देशाचा दर्जा देण्यात आला आहे. IFFIमध्ये यंदाच्या वर्षी 'उरी- द सर्जिकल स्ट्राईक', 'एफ२', 'गली बॉय', 'सुपर ३०' आणि 'बधाई हो' या चित्रपटांती वर्णी लागली आहे.
IFFIच्या निर्णायक मंडळाकडून यंदाच्या वर्षासाठी भारतीय पॅनोरमाचा प्रारंभ करतेवेळी अभिषेक शाहद्वारा दिग्दर्शित 'हेलारो' या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. याशिवाय इतरही ३६ चित्रपट या सोहळ्यादरम्यान दाखवण्यात येणार आहेत. ज्यामध्ये लघुपटांचाही समावेश आहे.