तब्बल 64 कलाकारांचा हा `आकापेला` ऐकलात का?
मुंबई : मनोरंजन क्षेत्रात नेहमीच काही ना काही नवीन होत असते. आता संपूर्ण मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील कलाकाराच्या सहकार्याने “ आकापेला” या संकल्पनेवर आधारीत गाणे तयार केले आहे. काही दिवसातच लाखोंचे हिट्स या गाण्याला मिळत आहे. कौतुकांचा वर्षाव खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्वीट द्वारे केल. अमेय खोपकर यांच्या ए.व्ही.के एंटरटेन्मेंटच्या युट्युब चॅनलचा हा पहिला व्हिडीओ. विनय प्रतापराव देशमुख सरसमकर यांची सकंल्पना व दिग्दर्शन केलेला हा व्हिडिओ आहे.
पहिला मराठीतील माईम थ्रू टाईम मुळे लोकांपर्यंत पोहचलेला विनय देशमुख याचे हे दुसरे प्रसिद्ध होणारे गाणे आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंटने, विक्रांत स्टुडीओच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या या व्हिडीओची निर्मिती स्वाती खोपकर यांनी केली आहे. तब्बल सहासष्ट कलाकार, चव्वेचाळीस विविध नवी आणि जुनी गाणी या सर्वाचे मिळून एक गाणे “आकापेला”.
मराठी आणि हिंदीतील दिग्गज गायक, कलाकारांचा सहभाग या गाण्यामध्ये आहे. ‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा गाजलेल्या चित्रपटांचे आणि ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’या लोकप्रिय नाटकांचे निर्माते, अमेय विनोद खोपकर याची चित्रपट निर्मिती क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेला आहे. हरिहरन, सोनू निगम, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले आदी दिग्गज गायक कलाकारांनी मराठी मध्ये बहुचर्चित ठरलेल्या आणि गाजलेल्या विविध गाण्यांची ‘मेडली’ केली आहे. यामध्ये ब्लॅक ऍण्ड व्हाईट सिनेमा ते २०१८ सालच्या गाण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या व्हिडीओ मध्ये विक्रम गोखले, अशोक सराफ, महेश मांजरेकर, भरत जाधव, स्वप्नील जोशी, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, फुलवा खामकर, केदार शिंदे, अभिनय देव, मकरंद अनासपुरे, विक्रम फडणीस, मृणाल कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, रामदास पाध्ये, अतुल परचुरे, जितेंद्र जोशी, अजित परब, संजय जाधव, मंगेश देसाई, अनिकेत विश्वासराव, सोनाली खरे, विनोद कांबळी, किशोरी शहाणे,रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अभिनय बेर्डे, सायली संजीव, क्रांती रेडकर, दिपाली विचारे, आयान पटेल, मानसी नाईक, अभिनित पानसे, सचिन कुंभार, आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी, मधुरा वेलणकर,नीलिमा कुलकर्णी, साहिल जोशी, चारू देसाई,चेतन शाशिथल,अमोल परचुरे, सौमित्र पोटे, जयंती वाघधरे, प्रेरणा जंगम, विशाल इनामदार, बालकलाकार मृणाल जाधव, इशान खोपकर, तृष्णीका, स्नेहा चव्हाण, आदीसह मराठीतील अनेक सुप्रसिद्ध कलाकार झळकले आहेत. थोडक्यात सांगायचे तर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल असे वैविध्यपूर्ण गाण्यांचे मिश्रण आपणास या आकापेले संगीत प्रकारातील पहिल्या मराठी व्हिडीओ सॉंग मध्ये अनुभवायला मिळेल.