69th National Film Awards: आजवर मराठी चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटलेली पाहायला मिळाली आहे. 'आजचा दिवस माझा', 'जोगवा', 'बालगंधर्व', 'सैराट', 'गोष्ट एका पैठणीची' अशा अनेक मराठी चित्रपटांनी विविध श्रेणीत पुरस्कार पटकावले आहेत. 2004 साली आलेल्या 'श्वास' या मराठी चित्रपटानंही राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे मराठी चित्रपटांचा आगळावेगळा आशय, विषयाची मांडणी, कथा आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मराठी चित्रपटांचे अनेकदा कौतुक झाले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 68 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. या चित्रपटातून सुव्रत जोशी आणि सायली संजीव हे प्रमुख भुमिकेतून दिसले होते. अभिनेते सुबोध भावे यांनी हा चित्रपट प्रझेंट केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा चर्चा आहे ती म्हणजे 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची. आज दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटरमधून ज्यूरी यांच्यातर्फे राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावेळीही मराठी चित्रपटांनी दमदार बाजी मारली आहे. आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झाली असून यावेळी मराठी चित्रपटांनीही चांगलीच कामगिरी केली आहे. यावेळी संगीतकार आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांच्या 'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वात्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. 'गजवधना शोबॉक्स'तर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटातून सुमीत राघवन, मुक्ता बर्वे, मोहन आगाशे, उर्मिला कोठारे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री, सतीश आळेकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती. कुटुंबावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. यावेळी या चित्रपटानं सर्वात्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळवला आहे. याशिवाय मराठी चित्रपटांचा आणि मराठी कलाकारांचाही यावेळी डंका पाहायला मिळाला आहे 


अभिनेत्री पल्लवी जोशी यांना 'द काश्मिर फाईल्स' या चित्रपटासाठी सर्वात्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. या चित्रपटावरून अनेक वादही निर्माण झाले होते. ही प्रोपोगेंडा फिल्म असल्याची टीकाही या चित्रपटावर झाली होती. 


तर 'गोदावरी' या चित्रपटासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांना सर्वात्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. 'गोदावरी' या चित्रपटाची जोरात चर्चा होती. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री नीना कुळकर्णी, गौरी नलावडे, जितेंद्र जोशी, संजय मोने असे हरहुन्नरी कलाकार यावेळी या चित्रपटातून पाहायला मिळाले होते. हा चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या विषयानं या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगली दाद दिलेली होती.