72 Hoorain : 'द केरला स्टोरी' या चित्रपटात धर्मांतर, दहशतवाद आणि लोकांचे ब्रेनवॉश या सगळ्या गोष्टी दाखवण्यात आल्या. त्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यानंतर याच सगळ्या गोष्टी दाखवणारा '72 हूरें' या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित होताच वादाच्या भोवऱ्यात आलं. सोशल मीडियावर अनेकांनी या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. तर काही लोकांनी काही लोकांनी याचा विरोध केला. अनेकांनी या चित्रपटाला प्रोपेगेंडा म्हटले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 28 जूनला प्रदर्शित होईल असे निर्मात्यांनी सांगितले होते. मात्र, चित्रपटाच्या ट्रेलरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन हिरवा झेंडा दिला नाही. त्यांनी घेतलेल्या या निर्णयानं सगळ्यांना धक्का बसला आहे. नक्की काय झालं जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

CBFC नं ट्रेलरला सर्टिफिकेशन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी या निर्णयावर आक्षेप घेत आहेत. ट्रेलरला चित्रपटगृहात प्रदर्शित करता येणार नाही. आता हा ट्रेलर फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. सीबीएफसीच्या निर्णयावर चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित यांची एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्ही '72 हूरें' चे निर्माते असल्यानं आश्चर्यचकीत आहोत कारण CBFC नं आम्हाला ट्रेलरला सर्टिफिकेशन देण्यास नकार दिला आहे. खरंतर हे हास्यास्पद आणि वाईट वाटण्यासारखं आहे कारण या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. आम्ही एका मृतदेहाचे पाय दाखवले आहेत, ते सीबीएफसीने हटवण्यास सांगितले आहे. कुराणचा संदर्भ काढून टाकण्यास सांगितलं आहे. चित्रपटात प्राणी कल्याणासाठी काही गोष्टी आहे, पण त्या महत्त्वाच्या नाहीत. ज्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्ह ऑफ इंडियात पुरस्कार मिळाला. तेच सीन आहेत जे त्यावेळी चित्रपटात होते, तर ट्रेलरमध्ये काय आहे? आधी आम्ही तो पीव्हीआरमध्ये रिलीज करणार होतो, पण आता अंधेरीच्या क्लबमध्ये रिलीज करणार आहोत."


अशोक पंडीत पुढे म्हणाले, “तिथे बसलेले हे लोक कोण आहेत? ही अतिशय गंभीर बाब आहे. या चित्रपटाला इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात पुरस्कारही मिळाला आहे. तुम्ही त्या चित्रपटाचे सेन्सॉर प्रमाणपत्र कसे नाकारू शकता? सेन्सॉर बोर्डात काहीतरी गडबड आहे आणि त्याला प्रसून जोशी जबाबदार आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांकडून जबाव मागावे की त्यांनी असा निर्णय का घेतला. आम्ही अनुराग ठाकुर साहेब यांना विनंती करतो की यावर तुम्ही जरा लक्ष घाला आणि पाहा कोण आहेत जे आमचे स्वातंत्र्य काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत”.



दरम्यान, प्रसून जोशी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय पूरन सिंह चौहाननं केलं आहे. या चित्रपटात पवन मल्होत्रा आणि आमिर बशीर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 7 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.