मुंबई :  'मुसांजे गेलथी' हा एक कन्नड सिनेमा आहे. या सिनेमात श्रीनिवास बीपी आणि अभिनेत्री शालिनी मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा खूप जास्त चर्चेत होता आणि यामागचं कारण म्हणजे, या सिनेमातील बोल्ड सीन. खरंतर, या सिनेमा ज्या जोडीने बोल्ड सीन दिले आहेत. ती जोडीचं खऱ्या आयुष्यात  वडिल मुलीचं नातं आहे. आणि या कारणामुळे हा सिनेमा प्रचंड चर्चेत होता. खऱ्या आयुष्यातील वडिल आणि मुलीने मोठ्या पडद्यावर रोमांन्स केल्यामुळे या जोडीला प्रचंड ट्रोलिंगच शिकारही व्हावं लागलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाची कथा, याच कॉलेजमध्ये श्रीनिवास बीपी हा प्राध्यापक असून शालिनी ही त्यांची विद्यार्थिनी दाखवण्यात आली आहे. प्राध्यापक विद्यार्थिनीच्या प्रेमात पडतो आणि तो तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो.  'मुसांजे गेलथी' हा  एकमेव कन्नड चित्रपट आहे ज्यामध्ये वडील आणि मुलीने नायक आणि नायिकेची भूमिका साकारली आहे. आणि अतिशय बोल्ड सीन दिले आहेत. 


अभिनेत्री शालिनी आणि चित्रपटाचे प्रमुख/निर्माता/दिग्दर्शक बी.पी. श्रीनिवास यांची मुलगी चित्रपटाच्या पोस्टर्समध्ये बोल्ड अंदाजात दिसल्यामुळे खूप खळबळ उडाली होती. या सिनेमाचा पोस्टर रिलीज होताच अनेक संघटनांनी चित्रपटाला विरोध केला. यानंतर हा चित्रपट अफेअरबद्दल नाही आणि फोटोशूटमधून घेतलेलं प्रमोशनल डिझाईन्स चित्रपटाचा भाग नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी श्रीनिवासला पत्रकार परिषद बोलावावी लागली. मात्र, चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत टीका सुरूच होती.



मात्र एका बाजूला हा वाद जरी असला तरीही श्रीनिवास  चांगले संवाद लिहिणारे उत्तम लेखक आहेत आणि म्हणूनच नीटनेटका चित्रपट बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. श्रीनिवासने एका नैराश्यग्रस्त महाविद्यालयीन प्राध्यापकाची भूमिका साकारली आहे, ज्याला त्याच्या आणि एका विद्यार्थ्याच्या गैरसमजामुळे काढून टाकलं जातं. त्याच्या खऱ्या आयुष्यातील मुलीने बोल्ड विद्यार्थ्यीनीची भूमिका साकारली आहे.  



या सिनेमाचा त्यांना चांगलाच फटका बसला होता. कारण अशा आशयाचा सिनेमा आणि हा प्रयोग त्यांच्या नविन तर होताच पण प्रेक्षकांसाठीही हा अशा आशयाचा सिनेमा नविन होता. त्यामुळे या सिनेमाचा समाजावर परिणाम पडतोय हे दिसताच अनेकांनी या सिनेमाला विरोध दर्शवला होता. हा सिनेमा चित्रपटगृहातही फारसा चालला नाही. त्यामुळे या सिनेमाला सगळीकडूनचं फटका बसल्याचं पाहायला मिळालं.