नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध असलेली सीरीज 'गेम ऑफ थ्रोन्स' या वर्षी संपली. मात्र या सीरीजच्या नावावर अद्यापही अनेक रेकॉर्ड होत आहेत. 'गेम ऑफ थ्रोन्स'ने 'एमी २०१९' या अवॉर्डसाठी ३२ श्रेणींमध्ये नामांकन मिळवत एक नवा रेकॉर्ड केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७१व्या प्राइमटाइम एमी अवॉर्डसाठी मंगळवारी घोषणा करण्यात आली. या वर्षाच्या सुरुवातीला 'गेम ऑफ थ्रोन्स'ने ८व्या सीजनसह या सीरीजचा शेवट केला. प्रेक्षकांमध्ये ही संपूर्ण सीरीज अतिशय गाजली. 



याआधी, 'गेम ऑफ थ्रोन्स' या संपूर्ण सीरीजने सर्वाधिक व्ह्यूअरशिप असण्याचाही रेकॉर्ड केला आहे.



उत्कृष्ट ड्रामा सीरीज, सर्वोत्तम अभिनेता किट हॅरिंगटन, सर्वोत्तम अभिनेत्री एमीलिया क्लार्क, ग्वेंडोलिन क्रिस्टी, लीना हेडे, सोफी टर्नर आणि मेसी विलियम्स यांना चार सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रींसाठी, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून अल्फी एलेन, निकोलज कोस्टर, वाल्डाउ आणि पीटर डिंकलेज यांना नामांकित करण्यात आलं आहे. याशिवाय 'गेम ऑफ थ्रोन्स'चं इतरही कॅटेगरीजमध्ये नामांकन करण्यात आलं आहे.