शहनाज गिलकडे चाहत्याकडून विचीत्र डिमांड
बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल सोशल मीडियावर खूप पॉप्यूलर आहे.
मुंबई : बिग बॉस 13 ची स्पर्धक शहनाज गिल सोशल मीडियावर खूप पॉप्यूलर आहे. नुकतचं तिने ट्विटरवर आस्क मी एनिथिंग सेशन ठेवलं होतं ज्यामध्ये तिने आपल्या फँन्ससोबत गप्पा मारल्या. यावेळी शेहनाजच्या बऱ्याच फँन्सने ट्विटवर बरेच गंमतीशिर रिप्लाय केले. एका फँन्सने रिप्लाय करत म्हणलं 20 रुपयांची पेप्सी शहनाज गिल सेक्सी. शहनाजने याचं उत्तर देत लिहीलं की, तेरी ट्वीट की ऐसी की तैसी. शहनाजने अतिशय गंमतीशिर पद्धतीने या ट्विटला रिप्लाय दिलाय. यासोबत शेहनाजने या ट्वीटसोबत बरेच फिलींग ईमोजी देखील शेअर केले आहेत.
इतर अनेक चाहत्यांनीही त्यांच्या ट्विटमधून शहनाजकडून उत्तर मिळविण्याचा प्रयत्न केला. एका चाहत्याने लिहिलं, शहनाज बाबू, एका रिप्लायची किंमत तुम्हाला काय माहिती आहे. रिप्लाय देत शहनाजने लिहिलं की, शहनाज बाबू नाही, शहनाज एक बेबी आहे. याचबरोबर एका चाहत्याने धमकी देत ट्विट केलं की, जर शहनाजने रिप्लाय दिला नाही तर मी जेवणार नाही.
शहनाजने त्या चाहत्याला रिप्लाय देत लिहीलं की, उपवास आरोग्यासाठी चांगला असतो. याचबरोबर अजून एका चाहत्याने शहनाजला ट्विटमध्ये सांगितलं की, त्याची तब्येत बरी नाहीये आणि मला तुला मिठी मारायची आहे. यावर शहनाज मजेशीरपणे रिप्लाय देत म्हणाली, सहा फूट अंतर ठेवा, तुम्हाला व्हॅलेंटाइनची नाही तर क्वारंटाईनची गरज आहे. शहनाज हे बिग बॉस 13 नंतर प्रसिद्ध नाव बनलं होतं.
त्याचबरोबर, सिद्धार्थ शुक्लासोबतच्या तिच्या नात्याच्या खूप चर्चा झाल्या आणि चाहत्यांनी त्यांना सिदनाझ हे नाव दिलं. मात्र, गेल्यावर्षी सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाजला धक्का बसला. त्यातून ती हळूहळू सावरत आहे. गेल्यावर्षी ती दिलजीत दोसांझसोबत पंजाबी चित्रपट 'हौंसला रख'मध्ये दिसली होती.