Viral Video : (Weight gain) वजन वाढतंय लक्ष देत जा... जरा, किती लठ्ठपणा... काही वाटतं की नाही? असं स्थुल व्यक्तींना अनेकदा हिणावलं जातं. अनेकांनीच त्याचा सामना केला असेल. मुळात एखाद्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या शरीरयष्टीवरून हिणावणं हे (Mental harrasment) मानसिक खच्चीकरण करण्याजोगंच आहे. अशाच एका तरुणीचा व्हिडीओ Humans of bombay या इन्स्टाग्राम पेजवरील एका Video तून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये स्थूलतेमुळे खिल्ली उडवली जाण्यापासून याच स्थुलतेच्या बळावर प्रसिद्धी मिळवण्यापर्यंतचा एका तरुणीचा प्रवास सर्वांच्याच भेटीला आणण्यात आला आहे. (A plus size model shared her journey of accepting the way she is )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोष्ट एका Plus Size Model ची... 
आपली कहाणी सर्वांसमोर आणत ही मॉडेल म्हणाली, 'मी 12 वर्षाची होते तेव्हा अचानकच माझं वजन वाढू लागलं. अचानक ओढावलेल्या या स्थुलतेमुळे कुटुंबीयांनीही मला डॉक्टरकडे नेलं. तिथे hormonal imbalances मुळे हे सर्व होत असल्याची बाब समोर आली. हा तोच क्षण होता जेव्हा मी शरमेनं सुटलेलं पोट दिसू नये असे कपडे घालत होते'. 


लोकांनी आपल्याला 'मोटी' म्हणून हिणवू नये यासाठीच ती धडपड करत होती. पुढे शिक्षणावर लक्ष देत तिनं काही स्पर्धा आणि कलात्मक गोष्टींमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. जिथं एकता व्यासपीठावर असतानाच तिची एका मुलानं खिल्ली उडवली. पण, मोठ्या धाडसाने तिने त्या मुलाकडे कटाक्ष देत पाहिलं आणि खंबीरपणे स्वत:साठी उभं राहण्याचा हाच तिचा पहिला क्षण होता. 


अधिक वाचा : ...म्हणून लग्नानंतर 80 टक्के महिला लठ्ठ होतात, जाणून घ्या!


पुढे ती मुंबईत आली, जिथे मनाजोगे कपडे वापरण्यापासून मनागोजं वागण्याचं स्वातंत्र्य तिला मिळालं. प्रेमही मिळालं. पण, तुझा चेहरा कितीही गोड असला तरीही या स्थुल शरीराशी जवळीक साधणं शक्य नाही... असं प्रियकर म्हणाला आणि ती पुरती कोलमडली. पण, जो स्वत:लाच स्वीकारू शकत नाही, त्याला आपली शरम वाटूच शकते अशा विचारानं ती इथून पुढे गेली. 



आज Plus Size Model म्हणून तिची ओळख आहे. lingerie shoots, रॅम्प वॉक (Fashion show ramp walk) पर्यंत सगळीकडे तिनं आपला प्रभाव पाडला. शरीराचा, आपण जसे आहोत अगदी तसाच स्वीकार करण्याचा टप्पा तिच्या जीवनाला वेगळं वळण देऊन गेला. आज हीच मॉडेल (Model) मोठ्या गर्वानं तिचा प्रवास सर्वांपुढे मांडतेय, कौतुकास्पद आहे ना ही बाब?