`त्या` एका एका सीनमुळे `या` प्रसिद्ध अभिनेत्रीचं करिअर बरबाद
आयशा जुल्का नुकतीच Amazon Prime च्या `हश हश` या वेबसीरिजमध्ये दिसली.
मुंबई : आयशा जुल्का नुकतीच Amazon Prime च्या 'हश हश' या वेबसीरिजमध्ये दिसली. ओटीटीवरील तिची ही नवीन खेळी आहे. पण 1990 च्या दशकात एका क्षणी, आयशा ही एक अतिशय आशादायी बॉलिवूड अभिनेत्री होती आणि 1992 मध्ये तिला खिलाडी चित्रपटासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. त्याच वर्षी ती 'जो जीता वही सिकंदर' या चित्रपटात आमिर खानची नायिका म्हणून दिसली आणि तिच्या निरागसतेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पण पुढच्याच 'दलाल' (1993) या चित्रपटात असा धमाका झाला की आयेशाची कारकीर्दच कलंकित झाली. चित्रपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शकाविरुद्ध तिने जोरदार लढा दिला आणि तिला इंडस्ट्रीचा नैतिक पाठिंबा मिळाला हे बरं झालं. यामुळेच तिला बॉलिवूडमध्ये पुढे काम मिळत राहिलं.
आयशा तिच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच ती पडद्यावर परफॉर्म करणार हे स्पष्टपणे सांगत होती. तिला निर्माता प्रकाश मेहरा आणि दिग्दर्शक पार्थो घोष यांच्या दलाल चित्रपटाच्या शीर्षकामुळे साइन करायचं नव्हतं. पण प्रकाश मेहरा यांच्या पत्नीने आयशाला समजावून सांगितलं की, तिचा नवरा मोठा निर्माता-दिग्दर्शक आहे आणि तो कमी दर्जाचा चित्रपट बनवणार नाही. मिथुन चक्रवर्ती या चित्रपटात आयशासोबत स्क्रिन करणार होते.
जेव्हा चित्रपटाचं चित्रीकरण आणि डबिंग करण्यात आलं होतं, त्याच्या ट्रायल शोनंतर एका रात्री, एका पत्रकाराने आयशाला फोनवर विचारलं की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बोल्ड सीन करण्याची गरज का आहे? हे ऐकून आयशाला धक्काच बसला. चित्रपटातील नायिकेवर बलात्कार करताना आयेशाच्या बॉडी डबलचा वापर करून निर्माता-दिग्दर्शकाने अर्ध-नग्न आणि आक्षेपार्ह दृश्ये शूट केल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक झाल्याचं आयेशाच्या लक्षात आलं.
याबाबत आयशाने चित्रपटसृष्टीतील संघटनांकडे तक्रार केली. निर्माता-दिग्दर्शकाने जाहीर माफी मागावी, असंही ती म्हणाली. सुरुवातीला निर्माता-दिग्दर्शक यासाठी तयार नव्हते आणि आयेशाला बॉडी डबलबद्दल माहिती असल्याचं सांगितलं. पण हे खोटं असल्याचंही आयशाने सांगितलं आणि त्यानंतर कायदेशीर पाऊल उचललं. त्यानंतर दिग्दर्शक पार्थो घोष यांनी प्रकाश मेहरा यांच्या लेटरहेडवर एक पत्र लिहून आयेशाच्या परवानगीशिवाय आक्षेपार्ह दृश्यांसाठी बॉडी डबल वापरल्याबद्दल माफी मागितली.
यामुळे प्रकरण शांत झालं पण ही घटना आयशाच्या कारकिर्दीवर डागाप्रमाणे नोंदवली गेली. पुढे तिला चित्रपट मिळत राहिले. कधी तिचं नाव अक्षय कुमारशी तर कधी नाना पाटेकर यांच्याशी जोडलं गेलं. आयशाने शेवटी एका व्यावसायिकाशी लग्न केलं.