मुंबई : मीरा नायरची सीरिज 'ए सुटेबल ब्वॉय' A Suitable Boy first look चा पहिला लूक समोर आला आहे. ईशान खट्टर आणि तब्बू स्टारर असलेल्या या सीरिजचा पहिला लूक ईशानने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या सीरिजमध्ये ईशानने आपल्यापेक्षा अनेक वर्ष मोठ्या असलेल्या तब्बूसोबत काम केलं आहे. या फोटोत दोघं एका झोपाळ्यावर रोमँटिक पोझमध्ये बसले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा फोटो शेअर करताच इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या फोटोवर चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये आयुष्मान खुराना, करण जोहर आणि मीरा राजपूत यांचा समावेश आहे. 



मीरा नायरच्या या आगामी प्रोजेक्टमध्ये ईशान 'मान कपूर'ची भूमिका साकारत आहे. हे पात्र आपले राजकीय नेता महेश कपूरसोबत प्रेमाकरता बंडखोरी करताना दिसणार आहे. वडिलांच्या भूमिकेत राम कपूर असून ईशान ज्या मुलीच्या प्रेमात आहे. ती वेश्या 'सईदा बाई' असून तिची भूमिका तब्बू साकारत आहे. 


ही सीरिज 'ए सुटेबल ब्वॉय' या विक्रम सेठच्या कांदबरीवर आधारित आहे. या कांदबरीची विक्री सर्वाधिक झाली असून सहा पार्टमध्ये ही सीरिज तयार केली आहे. या वेबसीरिजमध्ये ईशान, तब्बू आणि रामसोबतच रसिका दुग्गल, नमिता दास, दिनेश रिझ्वी आणि माहिरा कक्कड मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये नसिरूद्दीन शाह यांचा मुलगा विवान शाह देखील दिसणार आहे.