मुंबई :  एखाद्या कलाकाराप्रती चाहत्यांचं प्रेम नेमक्या कोणत्या आणि किती सीमी ओलांडेल याचा काहीच नेम नसतो. आपल्या आव़डत्या कलाकाराच्या आगामी चित्रपटांच्या धर्तीवर किंवा कोणा एका खास निमित्ताने चाहत्यांची ही फौज असं काही करुन जाते की, याची दखल  घेतल्यावाचून राहता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या अशाच एका हॉटेलमध्ये / रेस्टॉरंटमध्या साहोच्या निमित्ताने चक्क साहो थाळी तयार करण्यात आली आहे. थाळी म्हटलं की आला चवीचा आणि भुकेचा मुद्दा. म्हणजे एका अर्थी ही 'साहो थाळी' प्रेक्षकांचं पोट भरण्यासोबतच त्यांच्या जीभेचे चोचलेही पुरवणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. 


'साहो थाळी' या नावाने समोर आलेल्या या खास थाळीमध्ये एकूण ३० खाद्यपदार्थांचा समावेश आहे. यामध्ये पनीर व्हेज कोल्हापूरी, भिंडी दहीवाला, राजस्थानी दाल, बाजरा रोटी, केसरी पुलाव आणि वेलची श्रीखंड या पदार्थांचाही समावेश आहे. या थाळीमध्ये जवळपास पाच ते सहाजण भरपेट जेवू शकतात असं, त्या रेस्टॉरंटचे संस्थापक आशिष महेश्वरी म्हणाले. 



मुख्य म्हणजे या थाळीची माहिती थेट प्रभासपर्यंतही पोहोचली आहे. ज्याविषयी त्याने आनंद व्यक्त केला. 'मला आणि माझ्या चित्रपटांना प्रोत्साहन देण्याची चाहत्यांची ही पद्धत मला फार आवडते. साहो चित्रपटाच्याच अनुशंगाने समर्पित अशी थाळी तयार करणं ही खरंच खुप सुरेख बाब आहे. प्रेक्षकांचं हे प्रेम आणि त्यांच्य़ा अपेक्षा पाहता मी त्यांच्याशी न्याय करु शकेन अशीच आशा व्यक्त करतो', असं प्रभास म्हणाला.