Animal Advance booking tickets price : अभिनेता रणबीर कपूरच्या Animal हा चित्रपट प्रदर्शीत होण्यााधीच चर्चेत आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  याचे एडव्हान्स तिकीट बुकींग सुरु झाले आहे. एका तिकीटाची किंमत तब्बल 2400 इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित झाले. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या या चित्रपटाचे सतरंगा हे गाण देखील चांगलच गाजत आहे. या चित्रपटाची जोरात चर्चा आहे.  पोस्टर पाहिले असता या चित्रपटात रणबीरचा राऊडी लूक पाहायला मिळत आहे. डोळ्याला गॉगल लावलेल्या रणबीरच्या तोंडात सिगारेट दिसत आहे. 'अ‍ॅनिमल' सिनेमाच्या पोस्टरमुळे चाहत्यांना हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता लागली आहे. अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असणार आहे. याबरोबरच बॉबी देओल, शक्ती कपूर, परिणीती चोप्रा हे कलाकारही दिसणार आहेत.


1 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2023 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. याचे एडवान्स सुकिंग सुरु झाले आहे.  दिल्ली आणि मुंबईतील तिकीट दर खूपच जास्त आहेत. 2400 रुपयांपर्यंत एका तिकीटाचे बुकींग झाले आहे. 25 नोव्हेंबरपासूनच याचे बुकींग सुरु झाले आहे. 


रणबीर कपूरचा लुक प्रचंड चर्चेत 


रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर अशी तगडी स्टारकास्ट यावेळी दिसते आहे. त्यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. त्यातून रणबीर कपूरचा लुकही प्रचंड चर्चेत आहे. यावेळी या ट्रेलरला अल्पावधीतच प्रचंड व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक जण या ट्रेलरमधील सुरूवातीच्या सीनची तुलना एका प्रसिद्ध बॉलिवूडमध्ये चित्रपटातल्या सीनशी करताना दिसत असून त्या चित्रपटातील अनेक सीन हे अॅनिमलच्या ट्रेलरमध्ये असल्याचा दावा होताना दिसतो आहे. त्यामुळे याची चर्चा आहे. यावेळी या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनीही प्रचंड कमेंट्स केल्या आहेत. आम्ही बोलतोय तो चित्रपट आहे 'एक रिश्ता : अ बॉन्ड ऑफ लव्ह' आणि 'वक्त: द रेस अगेन्स्ट टाईम'. सध्या या चित्रपटातील सीन्स आणि एनिमलच्या ट्रेलर मधील सीन्सची सोशल मीडियावर तुलना होताना दिसते आहे.