महाराष्ट्रातील `या` गावाला दिलं इरफानचं नाव
अशी कोणती गोष्ट गावकऱ्यांना भावली
मुंबई : २०२० हे वर्ष कसं सुरू झालं हे कुणालाच कळलं नाही. या वर्षात रूळत असतानाच जगभरावर कोरोनाचं सावट आलं. त्यापाठोपाठ बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार हे जग सोडून गेले. अभिनेता इरफान खानचं असं अचानक जाणं प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणार आहे. इरफान अभिनेता म्हणून ग्रेट होताच पण माणूस म्हणून इरफान अगदीच दानशूर होता.
नाशिक जिल्ह्रातील इगतपुरीमध्ये एका गावाला चक्क इरफानच नाव देण्यात आलं आहे. इरफानच्या प्रेमापोटी हे नाव बदललं असल्याच गावकरी सांगतात. पत्र्याची वाडी अस नाव असलेल हे गाव आता ‘हिरोची वाडी’ म्हणून ओळखलं जाणार आहे. आता प्रश्न पडला असेल की इरफानचा या दुर्मिळ खेड्याशी संबंध कसा?
खरतर इरफानचं या गावात एक छोटस फार्महाऊस होत. चित्रपट शूटिंग दरम्यान वेळ मिळाला की इरफान हमखास या खेड्यात चक्कर टाकायला येत असे. इरफान केवळ चक्कर टाकून थांबत नसायचा तर या गावातील गरजू लोकांना मदत करायचा. शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारं सामानही पुरवारचा. गावातील कित्येक व्यक्तींशी इरफान गप्पा मारत बसे.
इरफानच्या या आठवणींना उजाळा देण्यासाठी या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला.. गावच नाव बदलून ‘हिरोची वाडी’ करण्याची नामी शक्कल त्यांनी लढवली. एखाद्या सिनेअभिनेत्याच्या प्रेमापोटी गावाच नाव बदलणार इगतपुरीमधलं हे पहिलचं गाव असावं. या गावकऱ्यांनी इरफान खानचं अनुकरण त्यांच्या कृतीतून केलं आहे.