`बाईपण भारी देवा` पाहून आदेश बांदेकर भावूक; थिएटरबाहेर केदार शिंदेंना मारली कडकडून मिठी
Kedar Shinde and Aadesh Bandekar Photo: `बाईपण भारी देवा` हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. याच पार्श्वभुमीवर आता केदार शिंदे यांची पोस्ट व्हायरल होते आहे.
Kedar Shinde and Aadesh Bandekar Photo: 30 जूनला मराठीतला मोस्ट अवेटेड चित्रपट 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. हा चित्रपट कधीही एकदा प्रदर्शित होतोय याबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकताही लागून राहिली होती. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळतो आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांनीही हा चित्रपट पाहिला असून या चित्रपटाला सर्वांनीच कौतुकाची थाप दिली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. महाराष्ट्राचे लाडके भावजी आदेश बांदेकर यांनीही हा चित्रपट पाहिला आहे.
केदार शिंदे यांनी आदेश बांदेकर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. हा चित्रपट पाहून आदेश बांदेकर भावूक झाले आणि त्यांनी त्या भावनेनं चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांना कडकडून मिठी मारली आहे. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यावेळी केदार शिंदे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''गेली कित्येक वर्ष "होम मिनिस्टर" या कार्यक्रमाच्या निमित्ताने, दार उघड बये दार उघड म्हणत, वहिनींना मानाची पैठणी देणारा, त्यांचं मन जाणून घेऊन त्यांना बोलतं करणाऱ्या आदेश बांदेकरने काल बाईपण भारी देवा हा सिनेमा पाहून कडकडून मिठी मारली. बायकांच्या जवळचा भावोजी जेव्हा अशी प्रतिक्रिया देतो तेव्हाच कळून चुकतं की, आपल्याला बायकांच्या मनातलं नुसतं ऐकू नाही तर समजू लागलंय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.''
हेही वाचा - चष्मा गेला अन् वजनही घटलं... आमिर खानच्या लेकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आवाक!
सध्या त्यांच्या या फोटोखाली चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. आदेश बांदेकर आणि केदार शिंदे यांची चांगली आणि जूनी मैत्री आहे. त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धांमधून कामं केली आहेत. ते दोघंही पवई येथे एकाच इमारतीत राहतात. सध्या या चित्रपटाला कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर प्रेक्षकांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.
या फोटोखाली चाहत्यांनी कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. यावर्षीच केदार शिंदे यांचा 'महाराष्ट्र शाहीर' आहे चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांंनी तूफान प्रतिसाद दिला आहे. अंकुश चौधरीच्या अभिनयाचेही यावेळी प्रचंड प्रमाणात कौतुक करण्यात आले होते.