Aai Kuthe Kay Karte Actor Hotel in Thane Video: 'आई कुठे काय करते' ही मालिका गेली चार वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. त्यामुळे या मालिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते. हल्ली सेलिब्रेटी हे मल्टिटास्किंग करताना दिसत आहेत. अभिनयासोबत दुसऱ्या क्षेत्रातही आपलं करिअर फुलवताना दिसत आहेत. कुणी नवं हॉटेल काढतं तर कुणी नवं फॅशन स्टोअर. त्यामुळे त्यांच्या या नव्या स्टार्टअपची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका लोकप्रिय कलाकाराच्या हॉटेलची चर्चा रंगली आहे. त्यानं आपलं स्वत:च सॅण्डविच कॅफे ओपन केलं आहे. त्यामुळे सध्या त्याच्या छोट्याशा हॉटेलची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तो चक्क चहा बनवाताना दिसतो आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या व्हिडीओवर कौतुकास्पद कमेंट्सही केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आई कुठे काय करते' या मालिकेत अरूधंतीच्या मोठ्या मुलाची अभिषेक ही भूमिका साकारणारा निरंजन कुलकर्णी हा अभिनेता ठाण्यात स्वत:चे हॉटेल चालवताना दिसतो आहे. त्यानं स्वत:हून याबद्दलची एक पोस्ट शेअर करत आपल्या हॉटेलची माहिती चाहत्यांनी दिली आहे. त्यानं आपल्या चाहत्यांना कॅफेमध्ये आमंत्रित केले आहे. त्यानं आपल्या हॉटेलमध्ये चहा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी त्याच्या या व्हिडीओखाली चाहत्यांनी शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. त्यानं ठाणेच्या घोडबंदर येथे आपला हा कॅफे सुरू केला असून त्याचे नावं बडिज सॅण्डविच (Buddy Sandwich) असं ठेवलं आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की तो आपल्या कॅफेच्या किचनमध्ये आणि चहा करण्याची तयारी करतो आहे. यावेळी पोस्ट शेअर करताना त्यानं लिहिलं आहे की, ''रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा... कधी येता प्यायला?''


सध्या सेलिब्रेटी आणि त्यांच्या हॉटेलची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर यानेही अलीकडेच एक हॉटेल सुरू केले आहे. सोबतच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलानंही ठाण्यात स्वत:च हॉटेल सुरू केलं आहे. शशांक केतकरच्या आईच्या गावात या हॉटेलचीही बरीच चर्चा रंगली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या ही मालिका सर्वत्र गाजते आहे आणि सोबतच या मालिकेतील अनेक पात्र ही चांगलीच लोकप्रिय आहे. रोज या मालिकेत नव्यानं ट्विस्ट येताना दिसतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे.