`ती सेटवर आली की सारं वातावरण बदलून जातं...`, मधुराणी प्रभुलकरच्या पोस्टने वेधलं लक्ष
मधुराणी ही `आई कुठे काय करते` या मालिकेत अरुंधती हे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली.
Madhurani Prabhulkar Special Post For Janaki : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या विविध ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. या मालिकेत अरुंधतीचा दुसरा पती आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलं होतं. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला होता. यामुळे सध्या अरुंधती ही पुन्हा देशमुखांच्या घरात राहायला आल्याचे दिसत आहे. आता मधुराणीने या मालिकेतील बालकलाकार जानकीसाठी खास पोस्ट केली आहे.
मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. मधुराणी ही 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती हे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेमुळेच ती प्रसिद्धीझोतात आली. आता मधुराणीने मालिकेत झळकणारी बालकलाकार जानकीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मधुराणी प्रभुलकरची पोस्ट
या व्हिडीओत जानकी हातात माईक घेऊन काहीतरी गुणगुणताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने मालिकेच्या सेटवरील गंमती सांगितल्या आहेत. आमची ही छोटी जानकी ... ! बरं गंमत म्हणजे हिचं खरं नावही जानकी च आहे बरं का ! ही सेटवर आली की सारं वातावरण बदलून जातं... एक जिवंतपणा येतो संपूर्ण युनिटला... सगळेच तिच्या बाललीलांमध्ये रमून जातात ... आज आम्ही माईकच्या प्रेमात आहोत आणि माईकवरून आम्हला गायचंय...! लहानपण देगा देवा ....!!!! असे मधुराणीने म्हटले आहे.
मधुराणीच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. यावर एका चाहतीने अरुंधतीला इतक्या दिवसांनंतर इतकं आनंदी पाहून खूपच आनंद होतोय, असे म्हटले आहे. तर एकाने जानकी तर खूप छान आहेच पण अरुंधती मॅम ना हसताना पाहून खूप छान वाटलं, असे म्हटले आहे. तर एकाने खरच तुम्हाला खूप दिवसांनी हसताना पाहुन खुप छान वाटले, अशी कमेंट केली आहे.
दरम्यान मधुराणीने काही दिवसांपूर्वीच मालिकेत आशुतोषचा अपघाती मृत्यू झाल्याचा ट्वीस्टवर भाष्य केले होते. यात तिने अरुंधती आशुतोष ला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..! असे म्हटले होते.