मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेचं कथानक दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहे. सध्या मालिकेत अनघा आणि अभिषेकच्या साखरपुड्याची धामधूम सुरु असताना संजनाच्या येण्याने आनंदात विरजण पडलं आहे. शुभकार्यात विघ्न आणण्याचा संजनाचा मनसुबा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावली आहे. अरुंधतीचं हे रौद्ररुप संजनासाठी नक्कीच धक्कादायक आहे. पण जेव्हा जेव्हा आपल्या मुलांच्या सुखाचा प्रश्न असतो तेव्हा आईची कसोटीही लागतेच. आजवर स्वत:चं दु:ख बाजूला ठेऊन अरुंधतीने मुलांच्या सुखाचाच विचार केला आहे. म्हणूनच मुलांच्या सुखाआड येऊ पाहणाऱ्या संजनाला अरुंधतीने खणखणीत उत्तर दिलं आहे. 


अनिरूद्ध आणि अरूंधती यांचा लवकरच घटस्फोट होईल. अरूंधती घरातून निघून जाण्यापूर्वीच नवी व्यक्ती देशमुख कुटुंबात प्रवेश करणार आहे. अभिषेक-अनघाच्या साखरपुड्यामुळे सगळेच आनंदात आहेत. कोरोनाचा कहर वाढल्यामुळे अभिचा साखरपुडा कोकणात करण्याचा निर्णय घेतात. असं असताना आता मालिकेत एक नवं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 


अभिषेकच्या भुतकाळाबद्दल बोलायचं झालं तर अंकितासोबत अभिषेक काही वर्षे रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र अंकिताला परदेशात जायचं असतं आणि ती अभिषेकसोबतच नातं तोडून परदेशात जाते. या काळात अभिषेक खूप एकटा पडतो. अशा परिस्थितीत त्याच्या आयुष्यात अनघाचा प्रवेश होतो. 


अरुंधतीच्या या खणखणीत उत्तरावर संजनाची प्रतिक्रिया काय असणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.