मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते?'मध्ये एक नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर तो क्षण आला जेव्हा अरूंधती आणि अनिरूद्धचा घटस्फोट होत आहे. हे दोघं एकमेकांपासून कायमचे वेगळे होत आहे. मात्र अशातच एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. (Aai Kuthe Kai Karte : New twist in Arundhatis life, She will change the decision?) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरूंधती घटस्फोटानंतरही समृद्धी घरात येऊ शकते असं अप्पांनी सांगूनही ती वेगळा निर्णय घेणार का? असं दिसत आहे. '२५ वर्षांपूर्वी हा उंबरठा ओलांडून आत आले. आज सुद्धा ओलांडतेय, कधीही परत न येण्यासाठी.' अरूंधतीच्या या वाक्याचा अर्थ काय? देशमुख कुटुंबियांना याची कल्पना तरी आहे का? 



अरूंधती घर सोडून गेल्यामुळे साऱ्यांनाच तिची उणीव जाणवत आहे. अरूंधती असताना आपण किती वाईट वागलो याची जाणीव आजीला होते. आपण फक्त अरूंधती म्हणजे आपल्या सुनेलाच गमावलं असं नाही. आजी म्हणते,'मी माझी मैत्रिण, माझी मुलगी आणि माझी आई गमावली आहे.' आजीच्या या बोलण्याने साऱ्यांनाच त्रास होतो. 




मात्र तिकडे कोर्टात अरूंधती आणि अनिरूद्ध घटस्फोटावर सह्या करतात. आणि कायमचे वेगळे होतात. या दोघांचे मार्ग बदलतात. पण नंतर अरूंधतीच्या लक्षात येतं की, आपल्या गळ्यातील मंगळसूत्र तसंच आहे. जे नातंच राहिलेलं नाही त्याचा अलंकार का घेऊन मिरवायचा. म्हणून अरूंधती गळ्यातील मंगळसूत्र काढून अनिरूद्धच्या हातात देते. 


आतापर्यंत आपण अरूंधती अनिरूद्ध देशमुख होता. आता मी अरूंधती आहे. असा मनात विचार करत अरूंधती पुढील आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. मात्र या सगळ्यात अरूंधतीच्या तब्बेतीकडे दुर्लक्ष होतंय. हे आजारपण पुढे डोकं तर वर काढणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित राहतोय.