Aai Kuthe Kai Karte Fame Actress Madhurani Talked About Her Dimple : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kai Karte) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील प्रत्येक कलाकारानं अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale Prabhulkar) तर घराघरात पोहोचली आहे. मधुराणी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी मधुराणीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एक व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तुम्ही खोटी खळी कशी तयार केली असा प्रश्ना विचारला होता. त्यावर आता मधुराणीनं उत्तर दिलं आहे. मात्र, यावेळी ती खळी नसून एक आजार असल्याचा खुलासा मधुराणीनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधुराणीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत मधुराणीनं याविषयी खुलासा केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अरुंधतीनं कॅप्शन दिलं आहे की "मी आज माझ्या गालावरच्या जखमेविषयी बोलणार आहे. गेल्या वर्षात तिनी मला खूप शिकवलंय. स्वतः कडे आणि आयुष्याकडे बघायचा वेगळा दृष्टीकोण दिलाय. कदाचित तुम्हालाही ह्यातून काही हाती लागलं तर नक्की सांगा. नवीन वर्षाच्या खूप खूप खूप शुभेच्छा...!!!! "


"नमस्कार, आज मला तुम्हा सगळ्यांसोबत बोलायचंय माझ्या या जखमेबद्दल आणि गालावरच्या सिस्टबद्दल. दीड वर्षांपूर्वी माझ्या गालावर अचानक एक उंचवटा दिसायला लागला. नंतर मला कळलं की याला सीबीशीएस्ट सिस्ट म्हणतात. दीड वर्षांपूर्वी त्याचं ऑपरेशन झालं पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणि तुम्हाला आठवत असेल जून जुलै महिन्यात मी काही एपिसोड पट्टी लावूनही केले. मला या जखमेचे आभार मानायचेत कारण तिने मला खूप काही शिकवलं. मला आठवतंय की पट्टी लावून एपिसोड केले तेव्हा सिरीयलचा क्लायमॅक्स आला होता तरीही प्रेक्षकांनी अरुंधतीवर भरभरून प्रेम केलं. तिथेच मला या जखमेने स्वतःला स्विकारायला शिकवलं. माझ्यासाठी हा खूप मोठा धडा होता," असं मधुराणी बोलते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे मधुराणीनं सांगितलं की, "ऑपरेशननंतर मी लगेच कामाला सुरुवात केली त्यामुळे ही जखम भरून यायला खूप महिने लागले. त्यावेळी माझ्या मेकअप आर्टिस्टने आणि सगळ्यांनीच मला सांभाळून घेतलं. ती जखम बरी झाली आणि तिच्याजागी एक खळी तयार झाली. मलाही ती आवडली पण पुन्हा वर्षभराने मला गालाच्या आतून एक उंचवटा जाणवायला लागला आणि बाहेरून जखमेतून पस येऊ लागला. तेव्हा मात्र माझी अवस्था वाईट झाली. पुन्हा एकदा सर्जरी केली. यावेळेस लेझर सर्जरी केली. त्यामुळे आत असलेला उंचवटा खाली आणि वर असा आतल्या आत जाळावा लागला. मला माहितीये हे मेकअप न करता विचित्र दिसतंय."


हेही वाचा : Ex- Boyfriend सोबत जान्हवीचं पॅचअप? अनंत अंबानीच्या साखरपुडा मात्र चर्चा याच कपल


पुढे याविषयी तिला कसं वाटलं हे सांगत मधुराणी म्हणाली, "कॅमेऱ्यासमोर यायला मला काही वेळ भीती वाटत होती. जेव्हा मी माझ्या डॉक्टरांशी बोलले तेव्हा ते म्हणाले की ही जखम तुला वर दिसतेय. पण विचार कर की तू आत काही धरून ठेवलंयस का. आतून काही हिल व्हायचं राहिलंय का, आतून जो पर्यंत ही जखम आरोआप बरी होईल. त्यानंतर मला जाणीव झाली की आपल्या आयुष्यात आजूबाजूला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्याचं कारण आपले विचार आहेत. कुणाला माफ करायचं राहिलंय का? कुणावरचा राग राहिलाय का? वर्षाच्या शेवटी आपण हे राग सोडून देऊया."


दरम्यान, काही दिवसांपूर्वी मधुराणीनं पाश्चात्य लोकांसारखे कपडे परिधान केल्यामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यावर मधुराणीनं सडेतोड उत्तर दिले आहे. ट्रोल करणाऱ्या या नेटकऱ्याला उत्तर देत मधुराणी म्हणाली, “मी वैयक्तिक आयुष्यात काय करायचं हे मला सांगणारे तुम्ही कोण? मराठी परंपरेचा इतका पुळका आहे तुम्हाला मग तुम्ही पाश्चात्य लोकांचा ब्लेझर घालून फोटो का काढलाय? मराठी पेहराव करायला हवा होतात नं” मधुराणीचं हे उत्तर पाहता नेटकऱ्यांनी तिची साथ दिली आहे.