मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील अनेक मालिकांनी आज घराघरात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यातीलच एक म्हणजे आई कुठे काय करते हे मालिका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेची चर्चा पाहायला मिळत आहे. मालिका विश्वात काम करणारे हे कलाकार त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे ही बऱ्याचदा चर्चेत दिसतात.


मनोरंजन विश्वात ब्रेकअप आणि पॅचअपच्या चर्चा अनेकदा होताना दिसतात. त्यात आता आई कुठे काय करते या मालिकेतील संजना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. 


संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिचा घटस्फोट झाल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यानंतर तिने तिचा बॉयफ्रेंड अंकित याची ओळख चाहत्यांना करुन दिली. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर पाहायला मिळायचे. 


अवॉर्ड शोमध्ये ही दोघे एकत्र दिसले. दोघांनी रेड कार्पेटवर एकत्र फोटो काढले. दोघांची बॉण्डिंग बघता सगळ्यांनाच वाटत होते की दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकतील, पण तसं होवू शकलेलं नाही. 


संजना अर्थात अभिनेत्री रूपाली भोसलेचा बॉयफ्रेंड अंकित मगरेसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. आता खुद्द रूपालीने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.


एका मुलाखतीत रूपाली यावर बोलली आहे की, ' ऑक्टोबरआधीच आम्ही वेगळे झालो आहोत. आम्ही दोघांनी सामंजस्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही सोबत नाही. पण मनात एकमेकांबद्दल कुठलीही कटुता नाही. आत्तापर्यंत आम्ही अधिकृतपणे यावर  बोललो नव्हतो'


पुढे ब्रेकअपमागची कारण सांगताना रुपाली म्हणाली, 'काम आणि कुटुंबाची सुरक्षा याला मी प्राधान्य देते. त्याआड काही गोष्टी येणार असतील तर त्या तिथेच संपवणं योग्य आहे. सोशल मीडियावर काही लाईक्ससाठी नातं ताणण्यात काही अर्थ नाही.



अंकित आणि मी आता संपर्कात नसलो तरी आमच्यातील संबंध सौहार्दपूर्ण असतील. मी त्याला शुभेच्छा देते. त्याने त्याचे ध्येय साध्य केल्यास मी नक्कीच त्याला फोन करून शुभेच्छा देईल. पण सध्या तरी आमच्यात अनावश्यक संभाषण नाही.