आई कुठे काय करते | ईशा संकटात तर यशला अटक होणार?
आई कुठे काय करते मालिकेत मोठा ट्वीस्ट, यश आणि ईशा या संकटातून कसे बाहेर पडणार?
मुंबई: आई कुठे काय करते मालिकेमध्ये सध्या वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. रंजक वळणावर मालिका पोहोचली आहे. अनिरुद्धला संजनापासून घटस्फोट घ्यायचा आहे. तर दुसरीकडे अरुंधतीचं चांगलं होत असल्याचं पाहून अनिरुद्धचा जळफळाट होत आहे.
ईशाला साहिलला विसरण्यासाठी सगळेजण समजावतात. त्यानंतर तिचं मन दुसरीकडे रमवण्यासाठी तिला बाहेर फिरायला घेऊन जातात. यश आणि ईशा बाहेर फिरायला गेले असताना त्यांच्यावर संकट ओढवतं.
आई कुठे काय करते या मालिकेत यश आणि ईशा एका पिकनिकला जातात. तिथे केदारही त्यांना भेटतो. पिकनिकदरम्यान ते एका फार्महाऊसवर जातात. तिथला ओनर नील असतो. नील ईशाच्या मागे लागतो. तिला पटवण्यासाठी प्रयत्न करतो.
नील सारखं आपल्याकडे पाहात आहे हे ईशाच्या लक्षात येतं आणि तिला अवघडल्यासारखं होतं. नीलचा हेतू यशच्या लक्षात येतो. त्यामुळे यश ईशाला एकटं सोडत नाही. फार्महाऊसवर रात्री गप्पा सुरू असताना अचानक ईशा दिसत नाही.
त्यावेळी यश अस्वस्थ होतो. तिला शोधण्यासाठी जातो. तेव्हा ईशा संकटात असल्याची चाहूल त्याला लागते. नील ईशावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी यश तिथे पोहोचून ईशाला त्याच्या तावडीतून सोडवतो. यावेळी नील आणि यशमध्ये झटापटी होते. नील यशवर चाकूने हल्ला करणार तेवढ्यात यश नीलवर हल्ला करतो.
ईशाला सोडवण्यासाठी यश नीलला मारतो. यामध्ये त्याला डोक्याला मार लागतो आणि रक्तस्त्राव होतो. नील बेशुद्ध होतो. आता नीलचे खरे प्रताप सगळ्यांसमोर येणार का? यशला या प्रकरणात अटक होणार का? यश आणि ईशा पुढे या संकटाला कसं तोंड देणार ते आता पाहावं लागणार आहे.