आकाशची ही मेहनत नक्की कशासाठी?
सैराट हा सुपरडुपर हिट सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेला आकाश ठोसर म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका परश्या.
मुंबई : सैराट हा सुपरडुपर हिट सिनेमातून एका रात्रीत स्टार झालेला आकाश ठोसर म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका परश्या. परश्या या व्यक्तिरेखेने आकाशला अल्पावधीतच लोकप्रिय केले. एका सिनेमातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यानंतर एफ यू या सिनेमात आकाश झळकला. पण त्याचा हा प्रयोग मात्र फसला, असेच म्हणावे लागेल. त्यानंतर आकाश नवं काय घेऊन येणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
अलिकडेच आकाश नेटफिक्सच्या लस्ट स्टोरीज या वेब सिरीजमध्ये झळकला. पण आता तो त्याच्या फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष देत असल्याचे समोर आले आहे. जिममध्ये घाम गाळतानाचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. या व्हिडिओत आकाश जिममध्ये जबरदस्त मेहनत घेताना दिसत आहे. ही मेहनत आगामी सिनेमासाठी तर नाही ना? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या फिटनेसचे भरभरून कौतूक केले जात आहे.
मुळचा कुस्तीपटू असलेला आकाश ध्यानीमनी नसताना अल्पावधीतच स्टार झाला. आता पुढे आपल्या प्रेक्षकांसाठी तो काय घेऊन येणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.