मुंबई : सध्या कोरोनानाचा वाढता प्रार्दुभाव सगळीकडेच पहायला मिळत आहे. कोरोनाचं सावट सर्वसामांन्यापासून ते कलाकारांनावर आलं आहे. राजकीय नेत्यांनंतर आता कोरोनाच्या विळख्यात अभिनेता आमिर खान सापडला आहे . आमिर खानचा कोव्हिड रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका रिपोर्टनुसार आमिर खानला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याने घरीच स्वत:ला क्वॉरंटाईन करुन घेतलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार त्यानं आपल्या कर्मचाऱ्यांचीदेखील  चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला आहे.


आमिर खानने आपल्या कर्मचार्‍यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सर्व खबरदारी घेऊन नियमांचं पालन करण्यास त्याच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. कोरोनातून बाहेर आल्यानंतर ते लालसिंग चड्ढा सिनेमाचे शूटिंग करणार आहेत. यापूर्वी रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया आणि सतीश कौशिक या कलाकारांचीही कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली होती.


गेल्याच आठवड्यात, त्यांनी त्यांच्या 56वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या एका दिवसानंतरच त्यांनी, जाहीर केले की आपण सोशल मीडिया सोडलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत. ''माझी शेवटची पोस्ट आहे. मी सोशल मीडिया सोडत आहे. यापुढे तुम्हाला आमिर खान प्रॉडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर माझ्या आयुष्याविषयी आणि चित्रपटांविषयी सगळी माहिती मिळेल. कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी सोशल मीडिया सोडत असल्याचे तो म्हणाला. असं तो पोस्ट शेअर करत म्हणाला.