COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख सारख्या बड्या स्टारकास्टचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा खूप चर्चेत आहे. धमाकेदार ट्रेलरनंतर आता या सिनेमाचं 'वाशमल्ले' रिलीज झाल आहे. या गाण्यात आमिर खान आणि अमिताभ बच्चनसोबत जल्लोष करताना दिसत आहे. हा पहिला सिनेमा आहे जिथे आमिर - अमिताभ एकत्र पाहायला मिळणार आहे. या गाण्याबाबत चाहते देखील खूप एक्साइट आहे.


हे गाणं सुखविंदर सिंह आणि विशाल ददलानीने गायलं असून या गाण्याला अजय -अतुलने संगीत दिलं आहे. हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी हे गाणं लिहीलं आहे. तसेच या दोन्ही कलाकारांच्या गाण्याची कोरिओग्राफी प्रभूदेवा यांनी केली आहे. हा एपिक अॅक्शन अॅडवेंचर सिनेमा ब्रिटीश लेखक आणि प्रशासक फिलीप मीडोज टेलरच्या 1839 च्या उपन्यास कंफेशंस ऑफ ए ठगवर आधारित आहे. यामध्ये एका ठगची कथा आहे ज्याची गँग 19 व्या शतकात ब्रिटीश भारतात इग्रंजांची डोकेदुखी बनले होते. 



हा सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाची खास बात म्हणजे आमिर आणि बीग बी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.