Aamir Khan Ira Khan Mental Health Video: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्तानं अनेक जणं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरून आपले अनुभव आणि मानसिक आरोग्याप्रती जनजागृती करताना दिसत आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर #worldmentalhealthday असा हॅशटॅग फिरताना दिसतो आहे. आता आणखी एका व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आमिर खान आणि त्याची धाकटी मुलगी आयरा खान यांनी वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्तानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातून त्यांनी आपल्याही अनुभवाबद्दल प्रकर्षानं सांगितलं आहे. आयरा खान हिनं आपणही एकेकाळी नैराश्य, उदासीनता याचे शिकार झालो होतो आणि त्यातून आपणही बाहेर आलेलो असा अनुभव तिनंही शेअर केला आहे. काही दिवसांपुर्वी तिनं सुसाईड प्रिवेन्शनसाठी जनजागृती केली होती. सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबद्दल ती वेळोवेळी जनजागृती करताना दिसते. आज 10 ऑक्टोबर वर्ल्ड मेंटल हेल्थ डेच्या निमित्तानं तिनं आमिर खानसोबत एक 'बुद्धिजिवी' व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी मानसिक आरोग्यावर जनजागृती केली आहे. त्यामुळे सध्या त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आहे. ते दोघंही या व्हिडीओत नक्की काय म्हणाले आहेत ते पाहुया. आमिर खान म्हणाला, ''मी गणिताचा अभ्यास करण्यासाठी शाळेतील शिक्षिकेकडे जायचो.'' तेवढ्यात आयरा त्याला बरोबर करते आणि सांगते... ''किंवा ट्यूशन टीचरकडे.'' आमिर म्हणतो, ''जेव्हा आपल्याला केस कापायचे असतात तेव्हा आपण सलूनमध्ये जातो कारण केस कापणारी ती व्यक्ती ही त्या तंत्रात तरबेज असते.'' त्यापुढे आयरा म्हणते, ''घरात फर्निचर का काम असेल किंवा बाथरूममध्ये प्लबिंगचं काम असेल तर आपण योग्य त्या व्यक्तींना गाठतो आणि त्यानं काम पुर्ण केल्यावर आपलं काम सोप्पं होतं. जवळपास पुर्ण होतं. जेव्हा आपल्या बरं वाटतं नाही तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो.'' तेव्हाच आमिर खान म्हणतो, ''जीवनात अशी भरपूर कामं आहेत की जी आपण करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत ही लागतेच.''


याला धरूनच आमिर खान म्हणाला की, ''तेव्हा आपल्या या गरजा पुर्ण करण्यासाठी आपलं पटकन त्याचा निर्णय घेतो की आपली समस्या दूर करण्यासाठी आपण कोणाला बोलवायला हवं. यावेळी आपल्याला कसलीच लाज वाटतं नसते. काप्रेंट्रीचं काम असेल तर कार्पेंटर करते. आजारी असू तर डॉक्टरांनाकडे.'' तेव्हा आयरा म्हणाली की, ''अशाचप्रकारे आता जर का आपल्याला मानसिक आरोग्यसंबंधी मदत हवी असते तेव्हा आपण अशाच एका व्यक्तीकडे गेलं पाहिजे. जी व्यक्ती कसलीही तक्रार न करता, आपल्याला कधीही मदत करायला तयार होईल. जी व्यक्ती ट्रेन आहे आणि जी प्रोफेशनल आहे.'' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


30 वर्षांपासून घेतोय थेरपी : 


आमिर खान यावेळी म्हणाला की, ''दुसरं म्हणजे मी आणि माझी मुलगी आयरा आम्ही गेल्या तीस वर्षांपासून थेरपी घेतो आहोत. जर तुम्हाला मानसिक आजार आहे. स्ट्रेस आहे. कोणतीही भावनात्मक समस्या आहे तर तुम्ही नक्कीच अशा व्यक्तीची मदत घ्या जी तुम्हाला योग्य सहकार्य करेल. सोबतच ती व्यक्ती ट्रेन्ड असेल आणि जी तुमची मदतही करू शकेल. तुम्हाला शुभेच्छा!'' सध्या त्याच्या या व्हिडीओखाली काहींनी नकारात्मक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हटलंय की, ''तुझ्या दोन घटस्फोटांमुळेच ती डीप्रेशनमध्ये गेली आणि आता हाच आमिर खान आता मेंटल हेल्थवर बोलतोय!''. तर दुसऱ्या एकानं कमेंट केली आहे की, ''एवढं बोललं तरी ते काऊंसिलर पैसेही घेतात.''