...अन् आमिर खान या पुरस्कार सोहळ्यात आला
बॉलिवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना जाणं टाळतो. पण शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
मुंबई : बॉलिवूडचा मि. परफेक्टशनिस्ट आमिर खान पुरस्कार सोहळ्यांना जाणं टाळतो. पण शुक्रवारी एका पुरस्कार सोहळ्यात पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.
शुक्रवारी आमिर खान ‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाला होता. या प्रसंगी अभिनेता रणवीर सिंग सोबतचे काही फोटोदेखील इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
कानामध्ये रिंग आणि पिळदार मिशीतला आमिर आणि रणवीरचा सेल्फी फारच कूल आहे. या फोटोखाली त्याने ‘ठग्स लाइफ #gqawards’असे कॅप्शन लिहले आहे.
‘जीक्यू मॅन ऑफ द इयर’या पुरस्कार सोहळ्यात आमिरला ‘क्रिएटिव्ह मॅव्हरिक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर रणवीर सिंगला एण्टरटेनर ऑफ द इयर’हा पुरस्कार मिळाला.
बॉलिवूडच्या अनेक स्टार कलाकारांनी 'जीक्यू' अॅवॉर्डला हजेरी लावली होती.
जीक्यू' अॅवॉर्डसचे इतर मानकरी
अनुष्का शर्मा -‘वूमन ऑफ द इयर’
राजकुमार राव -‘अॅक्टर ऑफ द इयर’
कोंकणा सेन शर्मा -‘एक्सलेन्स इन डायरेक्टर अॅण्ड अॅक्टिंग’
राहुल बोस -‘एजंट ऑफ सोशल चेंज’
श्रीदेवी -‘एक्सलेन्स इन अॅक्टिंग’
करण जोहर -‘प्रॉड्युसर ऑफ द इयर’
इरफान खान ‘आउटस्टॅण्डिंग अचिव्हमेंट’
सिद्धार्थ मल्होत्रा -‘मोस्ट स्टायलिश मॅन’