मुंबई : सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. आयरा खान अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे एकापेक्षा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. गेल्या महिन्यातच आयराने आपला वाढदिवस साजरा केला. ज्यामुळे देखील ती बरीच चर्चेत आली. आयराच्या वाढदिवसाला तिच्या घरातील सगळे मंडळी देखील हजर होते, ज्यामुळे तिचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरला. एवढंच काय तर आयराने वाढदिवशी बिकिनीवर काढलेल्या फोटोमुळे बरीच चर्चेत आली. या दरम्यान तिने आपला बॉयफ्रेंड नुपुरसोबतचे देखील फोटो शेअर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पुन्हा एकदा आयराने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला, जो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


या फोटोमध्ये आयरा खान आणि तिची बॉयफ्रेंड नुपूर शिखर बाथरोबमध्ये दिसत आहेत. बेडरूममध्ये दोघांची हा अंदाज चाहत्यांना खूप आवडला. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आयरा खानने लिहिले की, मॅचिंग रॉब्स, डेट नाईट. यासोबतच त्याने नुपूरलाही टॅग केले आहे.



या फोटोवरुन हे लक्षात येत आहे की, आयरा खान तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर आहे.


हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे आणि आयराच्या या बोल्ड स्टाईलवर नेटिझन्सकडून जोरदार कौतुक होत आहे.