डीप नेक ब्लाऊजमध्ये आमिरच्या मुलीचा बोल्ड लूक; ईद पार्टीला लावले `चार चाँद`
आमिर खानची मुलगी आयराने ईदच्या मुहूर्तावर बॉयफ्रेंडसोबतचे असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यानंतर तिच्या बोल्डनेसची सर्वत्र चर्चा होत आहे.
मुंबईः सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या लाईफस्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. आयरा खान अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे एकापेक्षा एक सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते, मात्र आयराने ईदच्या मुहूर्तावर बॉयफ्रेंडसोबतचे असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यानंतर तिच्या बोल्डनेसची सर्वत्र चर्चा होत आहे.
ईद जगभरात उत्साहात साजरा करण्यात आली. बॉलीवूड सेलेब्समध्येही ईद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. आता सर्व सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
या फोटोजमध्ये आमिर खानची मुलगी आयरा खाननेही तिच्या ईद सेलिब्रेशनची झलक इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे. आयराने तिच्या मित्र आणि बॉयफ्रेंडसोबत ईद साजरी केली, आता तिचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. नेहमीप्रमाणे, ईदच्या दिवशीही इरा तिच्या प्रियकरासोबत रोमँटिक स्टाईलमध्ये दिसली. इराची ही हॉट स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे.
या फोटोंमध्ये आमिरचा भाचा इम्रान खानही दिसत होता, ज्याला पाहून चाहत्यांना धक्काच बसला. इम्रान आत्तापर्यंत कुठे होता असे प्रश्न विचारू लागले. इम्रान बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही आणि लाइमलाइटपासूनही दूर राहतो. त्यामुळे अचानक आमिरच्या मुलीच्या ईद पार्टीत त्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. फोटोंमध्ये त्याला ओळखणेही कठीण होत आहे.
त्याचबरोबर आयराच्या ड्रेसिंग सेन्सवरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.आयरा आणि नुपूरने सेलिब्रेशन दरम्यान एकत्र पोज दिल्या आणि खूप आनंदी दिसल्या. आयराने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.