तिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Ira Khan Engagement : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान (aamir khan) याच्या लेकिचा साखरपुडा झाला. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आयरा खान हिनं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. नुपूर आणि आयरानं यासाठीच टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे त्यांचा साखरपुडा. प्रियजन आणि मित्रांच्या उपस्थितीत हा छोटेखानी सोहळा पार पडला. यावेळी आमिर खान, किरण राव (Kiran rao) यांच्यापासून आमिरची आई आणि लहानगा आझाद सुद्धा पाहायला मिळाला होता. काही मराठमोळ्या कलाकारांचीही यावेळी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. (Aamir Khan daughter ira khan shares news engagment photos gets trolled again latest Marathi news )
नव्या फोटोंमुळंही आयरा खान ट्रोल (Ira Khan trolled)
खुद्द आयरा खान हिनंच Instagram वर तिच्या साखरपुड्यातील काही नवे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये या सोहळ्यातील काही Candid म्हणजे अगदीच Candid क्षण पाहायला मिळत आहेत. जिथं आयराचं किंवा कार्यक्रमासाठी आलेल्या इतर कुणाचंही लक्ष नसताना ते टीपले गेले आहेत.
यामधील एका फोटोमध्ये अभिनेता सिद्धार्थ मेनन (Siddharth menon) दिसत आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये आयराचा भाऊ आझाद खान दिसत आहे. हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे कारण अनेकांनीच तिचा सख्खा भाऊ कुठंय? असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
हेसुद्धा पाहा : किती Overacting! आमिरच्या लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video
'मला कधीच मी Pretty असल्याचं जाणवलं नाही. पण, त्या दिवशी मला ती जाणीव झाली. मला एक राजकुमारी असल्यासारखं वाटत होतं. कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही हावभावात माझा फोटो निघावा असं मला वाटत होतं', असं कॅप्शन आयरानं तिच्या या फोटोंना दिलं.
शेवटी व्हायचं तेच झालं...
आयरानं आतापर्यंत तिच्या साखरपुड्याचे बरेच फोटो शेअर केले. पण, यात ती सातत्यानं ट्रोलिंगची शिकार होताना दिसली. यावेळीसुद्धा त्याचीच पुनरावृत्ती झाली. कारण तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये कोणी पुन्हा तिच्या अतिउत्साही स्वभावावर टीका केली, तर कुणी तिच्या Outfit ला निशाण्यावर घेतलं. काय ते कपडे, काय तो उतावळेपणा आणि काय ती Overacting... असंच म्हणत आयरा पुन्हा एकदा भलल्यात कारणामुळं चर्चेत आली.
पण ही झाली नाण्याची एक बाजू. जगण्याचा मनमुराद आनंद लुटणारी आयरा आणि नुपूर शिखरे मात्र सध्या यापैकी कुठल्याच नकारात्मक गोष्टीला पाठींबा देत नसून ही मंडळी त्यांच्या नात्यावर आणि भावी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहेत.