मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खान (Ira Khan)  ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. इरा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इरा ही गेल्या दोन वर्षांपासून नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) रिलेशनशिपमध्ये होती. इरानं बऱ्याचवेळा नुपूरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, इरानं नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. (Aamir Khan Daughter Ira Khan) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : स्ट्रगलिंग अभिनेत्याला Rajinikanth यांच्या लेकिनं पती म्हणून का निवडलं?


इरानं बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. इराचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. इरा आणि नुपूर कॅमेऱ्यासमोर रिलॅक्स बसल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये इरा आणि नुपूर एका सोफ्यावर बसले आहेत. नुपूरच्या हातात चहाचा कप आहे आणि इरा त्याच्या मांडीवर बसली असून त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहे. इरा आणि नुपूरचे हे फोटो नेटिझन्सच्या पसंतीस उतरले आहेत. 




दरम्यान, काही दिवसांपूर्वी नुपूरनं तिला सगळ्यांसमोर लग्नासाठी प्रपोज केलं. (Ira Khan Engagement) इरानं होकार देताच नुपूरनं तिला अंगठी घातली. त्यानंतर इरानं त्याला किस केलं. नुपूर हा एक फिटनेस ट्रेनर आहे. त्यानं इराला फिटनेसची ट्रेनिंग दिली आहे. लॉकडाउनच्या काळात इरा आणि नुपूर जवळ आले आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात आहे. (aamir khan daughter ira khan shares romantic cosy photos with boyfriend nupur shikhare )