आमिर खानची मुलगी आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरे `या` सार्वजनिक ठिकाणी स्पॉट
बॉलिवूड इंडस्ट्रीचा परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी `लाल सिंग चढ्ढा` या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीचा परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर त्याची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर तिच्या सुंदर फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतचे फोटो शेअर करत असते. आयरा कधी तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर दिसली तर कधी ती क्वालिटी टाइम स्पेंण्ड करताना दिसते. पुन्हा एकदा नुपूर शिखरे आणि आयरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आमिर खानची मुलगी इरा खान बॉयफ्रेंडसोबत दिसली
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कधी ती फिटनेसवर चाहत्यांसोबत बोलत असते तर कधी नैराश्यावर आपलं मत मांडताना दिसते. जरी बहुतेकदा आयरा खान तिच्या बॉयफ्रेंड नुपूर शिखरसोबतच्या तिच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत असते. सध्या आयरा खान आणि नुपूर शिखरसोबतचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तो एखाद्या फूड कोर्टमधला असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही कॅमेराकडे पाहून स्माईल देताना दिसत आहेत.
आयराने ऑफ-व्हाइट क्रॉप टॉपवर ब्लॅक श्रग घातला आहे आणि ब्लॅक जीन्ससोबत पेअर केला आहे. तर दुसरीकडे, नुपूर शिखरने पांढऱ्या शॉर्ट्स आणि ग्रे कलरच्या टी-शर्टसह रिव्हर्स कॅप घातलेली दिसत आहे. हातात हात घालून दोघंही रोमँटिक पोज देत आहेत.
आयरा खान आणि नुपूर शिखरचा व्हिडिओ इन्स्टंट बॉलीवूडच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर शेअर करण्यात आला आहे. सध्या दोघांची ही रोमँन्टिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसतेय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.