Aamir Khan Ganpati Pooja Trolled: काल आमिर खानच्या लेकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे सध्या तिची सोशल मीडियावर जोरात चर्चा आहे. आमिर खानच्या लेकीला काहीच संस्कार नाहीत अशी जोरात चर्चा सुरू झालेली असून तिला प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. त्यातून काही दिवसांपुर्वी तिनं मानसिक आरोग्यासंबंधीही एक पुढाकार घेतला होता. त्यातून अनेकदा ती डिप्रेशनवरही बोलली आहे. त्यामुळे तिची अनेकदा चर्चा रंगलेली असते. तिच्या या मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती केल्याबद्दल आण तिच्या उपक्रमाबद्दल तिचे अनेकदा कौतुकही होताना दिसते. परंतु सोशल मीडियावर आपल्या बॉयफ्रेंडसह ती अनेक अतरंगी चाळे करताना दिसते त्यामुळे ती सतत ट्रोल होते. यावेळीही ती नेटकऱ्यांची शिकार झालेली आहे. त्यातून आयरा खानसोबत आमिर खानही अनेकदा ट्रोल होताना दिसतो. सध्या त्याच्या एका कृतीसाठी त्याला ट्रोल करण्यात आल्याचे इंटरनेटवर दिसू येते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षाभरापासून आमिर खानची काहीच चर्चा नाही. त्यातून गेल्यावर्षी म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये आलेला त्याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटाला अक्षरक्ष: प्रेक्षकांनी बॉयकॉट केले होते. त्यामुळे ट्रोलर्स आणि हेटर्सनी या चित्रपटाला अक्षरक्ष: धुळीतच मिसळवले होते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात आपटला आणि आमिर खानही प्रचंड प्रमाणात ट्रोल झाला होता. त्यानंतर आता तो नव्या एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे आणि तो राजकुमारी हिरानीसोबत काम करणार असल्याचीही चर्चा आहे. इथपासून ते तो मध्यंतरी नेपाळच्या विपश्यना केंद्रातही गेला असल्याची जोरात चर्चा रंगलेली होती. आधी किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यामुळे आमिर खान ट्रोल झाला होता. हा त्याचा दुसरा घटस्फोट होता त्यानंतर लाल सिंग चड्ढा हा चित्रपट. त्यानंतर आमिर खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला जेव्हा नुकताच घटस्फोट झाल्यानंतर तो किरण रावसोबत मंदिरात पुजा करताना दिसला होता. आम्ही तुम्हाला हे यासाठी सांगतोय की आता आमिर खान हा पुन्हा ह्याच कारणामुळे ट्रोल झाला आहे. 


हेही वाचा : 'नंतर आईचा पुनर्विवाह...' आजोबांच्या निधनानंतर लोकप्रिय अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल


सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. त्यामुळे सर्वत्र सेलिब्रेटीही गणेशोत्सवात उत्साहानं सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचीही जोरात चर्चा आहे. सध्या आमिर खान हा एका गणेशोत्सव मंडळात सहभागी झाला होता. यावेळी आरतीनंतर तो सगळ्यांनाच प्रसाद वाटताना दिसत होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली होती. यावेळी त्यानं साधीच वेशभूषा केली होती. त्यानं पांढरा कुर्ता आणि स्पेस घातला होता. त्यामुळे त्याची विशेष चर्चा होती. यावेळी त्यानं हातात ताट घेतले होते आणि मग तो सर्वांनाच मनोभावे प्रसाद वाटत होता. परंतु यावेळी तो प्रचंड ट्रोल झाला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


काही ट्रोलर्सनी त्याला ट्रोल केलं आहे तर अनेकांनी त्याची ही कृती पाहून त्याचं कौतुकही केलं आहे. ट्रोलर्स म्हणतात, 'चित्रपट हीट करण्याची ही निन्जा टेक्निक आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलंय, 'पीके चित्रपटात तर काहीतरी भलतंच बोलत होतात'. तर तिसरा म्हणाला, 'हा तर फक्त देखावा आहे' तर एकानं म्हणलंय की 'हे फक्त नावाला आहे'.