मुंबई : आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसच्या कामगिरीच्या बाबतीत अपेक्षेप्रमाणे जगू शकला नाही आणि त्याला चांगलाच फटका बसला. आमिरचा हा चित्रपट देखील बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडमध्ये आला. ज्याला त्याने तीन वर्षांचा दीर्घ कालावधी दिला होता. अशा परिस्थितीत आमिरची निराशा होणं साहजिक आहे. दरम्यान, दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन तो अमेरिकेला जाणार असल्याची नवीन बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तानुसार, नवीन प्रोजेक्टवर काम सुरू करण्यापूर्वी आमिरकडे स्वतःचा  माइंड मेकअप करण्यासाठी दोन महिने असतील. 'लाल सिंग चड्ढा'ला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद आमिरसाठी हृदयद्रावक होता.


आता अशा वातावरणात आमिरने दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याना दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल. यासोबतच 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याचाही विचारही तो करणार आहे.


आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूडचा हिट चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक होता. यात करीना कपूरशिवाय साऊथ स्टार नागा चैतन्यनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत दोन आठवड्यात केवळ 56 कोटी जमा करण्यात यश आलं आहे.


पुढील चित्रपट स्पोर्ट्स ड्रामा असेल
आमिर खानच्या पुढील चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा एक स्पोर्ट्स ड्रामा असेल, ज्याचं दिग्दर्शन आरएस प्रसन्ना करणार आहेत. याआधी त्यांनी 'शुभ मंगल झ्यादा सावधान' बनवला होता. 2018 मध्ये आलेल्या 'कॅम्पिओन' या स्पॅनिश चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असल्याचं सांगण्यात येत आहे. या स्पॅनिश चित्रपटाला त्या वर्षी ऑस्करसाठीही नामांकन मिळालं होतं आणि तो देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.