नवी दिल्ली : बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या 'मेरी हानिकारक बीवी' या आगामी मालिकेत अखिलेश पांडे ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. यासाठी करण सध्या खूप मेहनत घेत आहे. आहार आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देत आहे. 


या खानकडून प्रेरणा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सर्व करत असताना त्याचा आदर्श आहे बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान. आमिर खानकडून प्रेरणा घेत करण दररोज दोन तास व्यायाम करतो. डाएटही काटेकोरपणे पाळतो. गेल्या महिनाभरापासून त्याने मीठ आणि साखरचे सेवन केलेले नाही. 


करण म्हणतो...


करणने सांगितले की, "कोणाला नाही वाटणार स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी काहीतरी करावे ? याचाच विचार करून समर्पण, अनुशासन, कठोर मेहनत यामुळे येथे पोहचलो आहे. मला असं वाटतं की, तुम्ही फीट असली तर तुम्ही काहीही करू शकता. तुमच्या क्षमतांना काही मर्यादा राहत नाही."


अनेकदा शुटींगच्या व्यस्त शेड्युलमुळे व्यायाम करणे कठीण होते. मात्र तुमची दृढता महत्त्वाची ठरते, असेही तो म्हणाला. 'मेरी हानिकारक बीवी' या मालिकेचे प्रसारण एनडी टीव्ही वर होणार आहे.