मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा (Aamir khan)  नुकताच 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा रिलीज होण्यापुर्वीच बॉयकोट (boycott) करण्यात आला होता. या बॉयकॉटचा परिणाम त्याच्या फिल्मच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला आहे. त्यामुळे सिनेमाची कमाई हवी तितकीशी चांगली झाली नाही आहे. तरीही या सिनेमाने रिलीजआधीच कोटींची कमाई केली आहे. या कमाईचा आकडा एकूण तुम्हाला विश्वास बसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानचा (Aamir khan)  लाल सिंग चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत 37.96 कोटींची कमाई केली आहे. ज्या प्रकारची बंपर कमाई अपेक्षित होती, 'लाल सिंग चड्ढा' त्या निकषावर टिकू शकला नाही.


बॉलीवूडचे खुप वाईट दिवस सुरु आहेत. क्वचितच सिनेमे पडद्यावर चालतायत. त्या तुलनेत ओटीटी प्लॅटफॉर्म बॉलिवूड चित्रपटांना वाव मिळताना दिसत आहे.  कारण मोठमोठे चित्रपट भरमसाट किमतीत विकत घेऊन हे व्यासपीठ एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. असेच काहीसे आमिर खानच्या (Aamir khan)  लाल सिंह चड्ढाबाबतही बोलले जात आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार आमिर खानचा (Aamir khan)  'लाल सिंह चड्ढा' OTT प्लॅटफॉर्म Netflix ने विकत घेतला आहे. तथापि, प्लॅटफॉर्मने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. पण असे सांगितले जात आहे की रिलीज होण्यापूर्वीच या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट 160 कोटी रुपयांना विकला गेला होता. जर हा रिपोर्ट बरोबर असेल तर आमिर खानला त्याचा चित्रपट रिलीज होण्याआधीच मोठी रक्कम मिळाली आहे. 


बजेट किती?
'लाल सिंह चड्ढा'च्या (Laal Singh Chaddha) बजेटबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाचे बजेट 180 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.