मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान काही काळापासून सिने इंडस्ट्रीपासून दूर आहे. हा अभिनेता त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्याच्या पर्सनल आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. अभिनेता  2019 मध्ये, त्याच्या तुटलेल्या लग्नामुळे चर्चेत आला होता. अभिनेत्याने 2011 मध्ये गर्लफ्रेंड अवंतिकासोबत लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये हे कपल वेगळे झाले. आता जेव्हा इम्रान खान बऱ्याच दिवसांनी सार्वजनिकरित्या दिसला तेव्हा त्यांच्या डेटींगच्या बातम्याही समोर आल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान खान हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, अभिनेत्याचं वैयक्तिक आयुष्य याआधी चर्चेत राहिलं आहे. जाने तू या जाने ना स्टारर अभिनेत्याने त्याची पत्नी अवंतिका मलिकसोबत २०१९ मध्ये घेतला. यानंतर, अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनसोबत इम्रानच्या डेटिंगच्या अफवांना उधाण आलं होतं. 2021 मध्ये इम्रान आणि लेखाने त्यांच्या कथित रिलेशनशिपवर ठळक बातम्या दिल्या आणि आता या जोडप्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात अभिनेत्री क्रिती खरबंदा हिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला या दोघांनी हजेरी लावली होती.


डिनर डेटनंतर कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसोबत पोज देताना दिसला इम्रान खान
क्रिती खरबंदाने नुकताच  30 ऑक्टोबरला तिचा 33 वा वाढदिवस साजरा केला. या निमीत्ताने तिने वाढदिवसाची पार्टीही दिली. पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये इमरान खान वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला उपस्थित राहिला होत तर याचबरोबर त्याच्यासोबत त्याची कथित गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनही उपस्थित होती. पापाराझींनी या दोघांनीही एकत्र पोजही दिल्या ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या जोडीसोबत दिग्दर्शक पुनित मल्होत्रा ​​देखील या दोघांना जॉईन झाला होता. इम्रानने या पार्टीत सहभागी होण्यासाठी निळा टीशर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट निवडली होती. तर, लेखाने, एक आकर्षक पांढरा फ्लोरल-प्रिंट ड्रेस निवडला. दोघांनी त्यांच्या कारमध्ये एकत्र बसण्याआधी पापाराझींसाठी पोज दिल्या आहेत.