मुंबई :  बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आमिरचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. त्यात असलेले आमिरचे लूक हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आमिरचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. एवढंच काय तर आमिरच्या पाठी या व्हिडीओत पोलिस दिसत आहे. यामुळे सोशल मीडियावर अनेकांना प्रश्न पडला आहे की असं काय झालं आहे की आमिरच्या मागे पोलिस आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आमिरचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत आमिरचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. आमिरची वाढलेली पांढरी दाढी आणि त्याचं वजन वाढल्याचे दिसते. आमिरचा हा लूक पाहून प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. व्हिडीओत आमिर एका सोसायटीतून बाहेर येताना दिसत आहे. 


आमिरचा व्हिडीओ पाहा - 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आईचे निधन झाले असता त्यांच्या घरी आईच्या अंत्य दर्शनासाठी आमिर तेथे पोहोचला होता. तेव्हाचा आमिरचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला नाही. आमिरच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, 'आमिर आजोबा आले.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हा नक्की आमिरच आहे ना'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'आमिरला नक्की काय झालं आहे.' अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी करत त्याला ट्रोल केलं आहे. आणखी एक नेटकरी म्हणाला की 'आमिरच्या मागे पोलिस काय करत आहेत.' असा सवालही केला आहे.  


हेही वाचा : 14 वेळा गर्भधारणेचा केला प्रयत्न पण Salman Khan नं दिलेल्या एका सल्ल्यानं 'ही' अभिनेत्री झाली आई!


काही दिवसांपूर्वी आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात आमिरसोबत अभिनेत्री करीना कपूर खाननं मुख्य भूमिका साकारली होती. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. मात्र, ओटीटीवर हा चित्रपट सगळ्यात जास्त पाहिल्या जाणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे.