आमिरची दुसरी पत्नी राजघराण्यातील, या प्रसिद्ध अभिनेत्रीची आहे बहिण
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार संपवला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावसोबतचा 15 वर्षांचा संसार संपवला आहे. शनिवारी म्हणजे 3 जुलैरोजी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. त्यानंतर किरण आणि आमिर तुफान चर्चेत आले आहेत. आमिर-किरण यांची जोडी बॉलिवूजच्या प्रसिद्ध जोड्यांपैकी एक होती. आमिर आणि किरण वेगळे झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विभक्त होण्याचा निर्णय दोघांनी एकमताने घेत असल्याचं त्यांनी शेअर केलेल्या फॉर्मल स्टेटमेंटमध्ये सांगितलं
काय होतं फॉर्मल स्टेटमेंटमध्ये
'15 वर्षांच्या या सुंदर प्रवासात आम्ही एकत्र अनेक अनुभाव एकमेकांसोबत शेअर केले. आयुष्यातला आनंद वाटून घेतला. आमचं नातं विश्वास, प्रेम आणि सन्मानामुळे टिकून राहीला. पण आता आम्ही जीवनातील एका नव्या अध्यायाची सुरूवात करत आहोत. अनेक दिवसांपूर्वीचं आम्ही विभक्त झालो आहोत. पण आता आधिकृत घोषणा करत आहोत.'
कधी झाली आमिर आणि किरणची भेट
आमिरने 1986 मध्ये रीना दत्ताशी लग्न केले होते. आमिर जेव्हा किरणला भेटला तेव्हा देखील तो रीनाबरोबर होता. आमिरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, रीनासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याचे आणि किरणचे अफेअर सुरु झाले. आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 रोजी एकमेकांशी लग्न केले होते. यानंतर त्यांचा मुलगा आझादचा जन्म सरोगेसीच्या माध्यमातून 2011 मध्ये झाला होता.
राजघराण्यातील आहे किरण राव
किरण रावची ओळख भले आमिरची पत्नी म्हणून असेल पण ती एका राजघराण्यातील मुलगी आहे. किरण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीची (Aditi Rao Hydari) मामे बहिण आहे. किरण रावचे आजोबा, जे. रामेश्वर राव हे वानापार्थीचे राजा होते. वानापार्थी सध्याच्या तेलंगाणा या राज्यात येतं.