अभिनेता आमिर खानने मुलासोबत मारला हापूस आंब्यावर ताव
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो.
मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला आमिर खान त्याच्या चित्रपटांसोबतच आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी देखील चर्चेत असतो. अलीकडेच आमिर खानने एका व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. खरंतर, सुपरस्टार त्याच्या ताज्या फोटोमध्ये मुलगा आझादसोबत आंब्यावर ताव मारताना दिसत आहे. सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे आणि आपल्या प्रियजनांसोबत त्याचा आनंद लुटण्याची मजा काही औरच
अशा परिस्थितीत ही पिता-पुत्राची जोडी आंब्यावर ताव मारताना दिसत आहे. आंब्यांने भरलेलं ताट पाहून दोघंही त्यावर तुटून पडले. आमिरचं हे दृश्य त्याच्या चाहत्यांना खूप मनोरंजक वाटत आहे. कारण आमिर आणि आझादचे आंबे खातानाचे हे फोटो कँण्डिड आहेत. हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आमिर खान प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असं काही एन्जॉय केलं आहे का?'
सुपरस्टारचे हे फोटो पाहून त्याचे चाहते स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि ते पिता-पुत्र यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. विशेष म्हणजे आमिर खान बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. पण लालसिंग चड्ढासोबत तो पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात घर करणार आहे.