Aamir Khan With Stick : चित्रपटसृष्टीत सध्या लग्नसराई सुरु आहे. सतत कोणाचं ना कोणाचं लग्न होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यात आता भारत आणि स्टार इंडियाचे (Walt Disney Company India) अध्यक्ष के माधवन (K Madhvan Son's Wedding) यांच्या मुलाचे लग्न झाले. या लग्न सोहळ्यात बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल अनेकांनी हजेरी लावली होती. यावेळी बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं सगळ्यांचे लक्ष वेधले. आमिर खान (Aamir Khan) या लग्नात काढी टेकत चालत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लग्नसोहळ्यातील फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. यावेळी नेटकऱ्यांचे लक्ष आमिर खानवर पडले तर आमिर हा काढीच्या सहाय्यानं चालताना दिसत आहे. या कार्यक्रमात आमिरच्या हातात काळ्या रंगाची काढी दिसत असून तिच्याच सहाय्यानं तो चालत आहे. यावेळी आमिर इतर सेलिब्रिटींना भेटत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, तो मल्याळम अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आणि त्यांची पत्नी सुप्रियाला देखील भेटला. 



आमिरला पाहून नेटकरी कमेंट करत प्रश्न विचारत आहेत की, आमिर खानला काय झालं? काही लोक असेही म्हणत आहेत की आमिर खान आजकाल लग्नसोहळ्यांमध्ये खूप दिसत आहे, कदाचित तो 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chaddha) चित्रपटाच्या नुकसानीची भरपाई करत आहे. या आधी आमिर भोपाळमध्ये एका लग्न सोहळ्यात दिसला होता. त्यावेळी तेथे कार्तिक आर्यनही दिसला होता. 



दरम्यान, अक्षयनं यावेळी दाक्षिणात्य अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत भांगडा डान्स केला आहे. अक्षय कुमार आणि मोहनलाल यांच्या भांगडा डान्सने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.


हेही वाचा : Valentine's Week Special : अमिताभ बच्चन यांचे 'हे' रोमॅंटिक चित्रपट आता घर बसल्या पाहा


या लग्न सोहळ्यात सगळ्यांचे पांढऱ्या शेड्सच्या कपड्यांमध्ये दिसले. तर, या लग्नात आमिर खानसोबतच अक्षय कुमार आणि करण जोहर दिसले. लग्नात करणला पाहून नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत की आता त्याला लग्नाचे आमंत्रण देण्यात येत आहे. एकप्रकारे हे बरेच झाले. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की करणनं विषयी नेटकरी अशा कमेंट का करत आहेत. तर करणनं त्याच्या टॉक शो कॉफी विथ करणमध्ये म्हणाला होता की त्याला कतरिना आणि विकीच्या लग्नात बोलावले नाही म्हणून खूप वाईट वाटले होते.