Aamir Khan : दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक कलाकारांचे चित्रपट रिलीज होत असतात. खासकरून निर्माते त्यांचे चित्रपट वेगवेगळ्या सणांमध्ये चित्रपट रिलीज करत असतात. कारण सुट्टीच्या दिवशी प्रेक्षकांनी चित्रपट पाहावा. 2017 मध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये एक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. देशातच नाही तर विदेशात देखील या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला होता. देशातच नाही परदेशात देखील या चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात थिएटरमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. परंतु हा चित्रपट चिनी लोकांना प्रचंड आवडला. 14 दिवसांमध्ये या चित्रपटाने 500 कोटींची कमाई केली होती.


जगभरात चित्रपटाची जोरदार कमाई 


आमिर खानचा हा चित्रपट 19 ऑक्टोबर 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात 19 वर्षीय अभिनेत्री चित्रपटाच्या बजेट पेक्षा जास्त कमाई केली होती. भारतात हा चित्रपट जास्त चालला नाही. पण जगभरात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आमिर खानच्या 'सिक्रेट सुपरस्टार' या चित्रपटाचे बजेट 15 कोटी रुपये होते. मात्र, या चित्रपटाने जगभरात 800 कोटी रुपये कमवले. भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट ठरला होता. 


'सिक्रेट सुपरस्टार'ची चीनमध्ये मोठी कमाई


2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच जादू केली होती. 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटातील अभिनेत्री झायरा वझीमने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आमिर खानचा हा चित्रपट 19 जानेवारीला चीनमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. 'सिक्रेट सुपरस्टार' हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा आणि जास्त नफा कमावणारा चित्रपट ठरला. जगभरात या चित्रपटाने 858 कोटींची कमाई केली होती.