Aaradhya Bachchan Stunning Transformation : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जवळपास सगळेच सेलिब्रिटी हे आपल्याला जामनगरमध्ये पाहायला मिळाले. त्याचं कारण म्हणजे तिथे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं प्री वेडिंग होतं. त्यासाठी तीन दिवसांच्या या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सगळेच सेलिब्रिटी आपल्याला दिसले. त्यात सलमान खान पासून शाहरुख खान, रणवीर सिंग आणि दीपिका, रणबीर कपूर आणि आलिया, विकी कौशल आणि कतरिना कैफ पर्यंत सगळेच कलाकार दिसले. त्यापैकी एक म्हणजेच बच्चन कुटूंब आणि त्यातही सगळ्यांची लाडकी आराध्या बच्चन. आराध्या बच्चननं यावेळी सगळ्यांचे लक्ष वेधले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी आराध्या एका वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे. ऐश्वर्यानं क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर आराध्यानं गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर यावेळी आराध्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यावेळी आराध्याच्या नव्या लूकची चर्चा आहे. यावेळी आराध्याची नवीन हेअरस्टाईल पाहायला मिळाली आहे. आराध्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आता ट्विटरवर देखील तिच्याच लूकची चर्चा आहे. खरंतर अनेकांनी म्हटलं आहे की आराध्याचा हा लूक हूबेहूब 90 च्या दशकात दिसणाऱ्या ऐश्वर्याचा आहे. पहिल्यांदा आराध्याला वेगळ्या लूक आणि हेअरस्टाईलमध्ये पाहून नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. 



हेही वाचा : कोण आहे श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड? पहिल्यांदाच दिसले एकत्र



दरम्यान, आराध्याचा एक व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत आराध्या, अभिषेक आणि ऐश्वर्या हे बसून तिथे सुरु असलेल्या कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहे. बॅकग्राऊंडला सुरु असलेल्या गाण्यावर ते बसलेल्या ठिकाणाहून साथ देत आहेत.