Aaradhya Bachchan Video: स्टारकिड आराध्या बच्चन ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते. आराध्या ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओतून एक गोष्ट समोर आली आहे की आराध्या ही तिच्या आई-वडीलांप्रमाणे अप्रतिम अभिनेत्री आहे. नुकतंच तिच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात भाग घेतला होता. त्या नाटकाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांची नात आराध्याचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती तिच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसली. यावेळी आराध्याचा बदललेला लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. आराध्या बच्चन ही मुंबईच्या लोकप्रिय धीरूभाई अंबानी इंटरनॅशनव शाळेत शिकते. या शाळेत बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं शिकतात. शुक्रवारी या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं आराध्यानं देखील कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तर तिनं एक नाटक सादर केलं होतं. या व्हायरल व्हिडीओमध्ये आराध्यानं काळ्या रंगाचा स्टायलिश असा ड्रेस परिधान केला आहे. आराध्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून पहिल्यांदा आराध्याला एका वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये पाहिलं आहे. आराध्याचं कपाळ पहिल्यांदा सगळ्यांना पाहायला मिळत आहे. आराध्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या कार्यक्रमात आराध्याला सपोर्ट करण्यासाठी बच्चन कुटुंबानं हजेरी लावली होती. यावेळी ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि अगस्त्य नंदा एकत्र दिसले. या चौघांनी मिळून आराध्याला सपोर्ट केला. इतकंच नाही तर तिचा पर्फॉर्मंन्स सुरु असताना त्यांनी टाळ्या देखील वाजवल्या. तर नाटकातील तिच्या भूमिकेनं सगळ्यांना हॉलिवूड चित्रपट 'मेलफिशिएंट' मध्ये ऐश्वर्याच्या आवाजाची आठवण आली. 


हेही वाचा : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्यानं सोडलं बच्चन कुटुंबियांचं घर?


दरम्यान, आराध्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिच्या कपाळावर कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला 'अखेर, आराध्याचं कपाळ पाहिलं आणि ती खूप सुंदर दिसते.' दुसरा नेटकरी म्हणाला की 'भारताला शुभेच्छा, आता तिचं कपाळ पाहिल्यानंतर अखेर तुम्ही सगळे शांतीत अखेरचा श्वास घेऊ शकता.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'त्या घरातील दुसऱ्या मुलापेक्षा हिनं खूप चांगला अभिनय केला. पहिल्यांदा तिचं कपाळ पाहिलं आहे.'