Aashiqui चित्रपटामुळे अभिनेत्री अनु एका रात्रीच झाली स्टार, मग अचानक का घेतला संन्यास?
Aashiqui फेम अभिनेत्री Anu Aggarwal नं एका मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला होता.
Anu Aggarwal Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अनु अग्रवाल (Anu Aggarwal) 1990 साली प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' या चित्रपटातून प्रकाश झोतात आल्या. पहिल्याच चित्रपटामुळे अनु अग्रवाल या एकाच रात्री यशाच्या शिखरावर पोहोचल्या. आज 11 जानेवारी अनु अग्रवाल यांचा वाढदिवस आहे. 1990 साली आलेल्या या चित्रपटामुळे अनु रातोरात स्टार बनल्या. हा चित्रपट त्या काळी ब्लॉक बस्टर ठरला होता. मात्र अनु यांना या चित्रपटानं जितकं यश मिळवून दिलं तितकं कोणत्याच चित्रपटानं दिलं नाही. अनु यांनी अनेक चित्रपट केले मात्र, त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर अनु या हळू हळू चित्रपटसृष्टीतून लांब झाल्या.
आशिकी या चित्रपटातून मिळालेल्या यशाला अनु सांभाळू शकल्या नाही. अनु जेथे पण जायच्या तेथे त्यांच्या चाहत्यांची गर्दी असायची. अनु यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की तिनं स्टारडम सोडलं आणि योग विद्धापीठात प्रवेश घेतला जेथे त्यांना सांगितले की संन्यास घ्यायला पाहिजे. याच दरम्यान, त्यांचा एक अपघात देखील झाला होता. त्या अपघातामुळे त्यांचे आयुष्य बदलले. अपघातामुळे त्यांची स्मरणशक्ती गेली होती. 2021 मध्ये अनु यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नेमकं काय घडलं होतं हे सांगितलं.
याविषयी सांगताना अनु पुढे म्हणाल्या, 'मला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मी किती महिने रुग्णालयात होते हे मला माहित नाही. नर्स माझी देख रेख करायच्या. अपघातानंतर डॉक्टरांनी सांगितले होते की माझा 2 वर्षात मृत्यू होईल. कोमात असल्यामुळे त्यातून बाहेर कधी येईल हे माहित नव्हते. माझे आई-वडील रडायचे, पण मला भरोसा होता की मी ठीक होणार. मी यासाठी ठीक होईल कारण मला सगळ्यांना खूश करायचे होते. घरी देखील मी बरेच महिने बेड वर होती. मग मला चालायला शिकवले. हा माझा दुसरा जन्म होता.'
2001 साली अनु यांनी संन्यास घेतला होता. अनु अग्रवाल जेव्हा संन्यासी झाल्या तो अनुभव सांगत म्हणाल्या, 'तेथे पाच अंश तापमान होते. गिझर नव्हतं. माझ्याकडे फक्त दोन जोड कपडे आणि एक स्वेटर असलेली बॅग होती. त्यात मी बरीच वर्षे घालवली. तेथे आमचं पहिलं लेक्चर साडेचारला असायचे. दरम्यान, आंघोळ करून कपडे सुकविण्यासाठी बाहेर ठेवावे लागतात. कपडे सुकवण्यासाठी खूप लांब जावे लागत होते. मी 2:30 ला उठले, तरच मी 4 वाजता तयार होऊ शकत होते. त्यात आम्ही थंड पाण्यानं अंघोळ करायचो, थंड पाण्यातच कपडे धुवायचे. अनेक महिने तर माझे हात गोठल्यासारखे झाले होते. मुंडण केल्यामुळे डोक्यावर देखील थंड हवा लागायची.
हेही वाचा : इतके दिवस मनोरंजन केल्यानंतर, 'या प्रसिद्ध अभिनेत्यानं दिला Chala Hawa Yeu Dya शो ला निरोप?
दरम्यान, 2006 साली अनु यांनी कमबॅक केले होते. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांच्या घराच्या आजुबाजूला संपूर्ण मीडियानं वेधले होते. इतक्या वर्षांनंतर मला पाहताच अनेकांनी माझे Before आणि After फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. माझे नो मेकअप लूक व्हायरल होऊ लागले. ते सगळं पाहून तर मला खूप मोठा धक्का बसला होता.