लाइमलाईटमध्ये राहण्यासाठी अभिनेत्री करते `हे` काम; मुलाखतीत केला खुलासा
प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री लाइमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेल प्रयत्न करत असतात. काहींच्या वाट्याला ही लाइमलाईट सहजासहजी येते तर काहींना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो.
मुंबई : प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री लाइमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेल प्रयत्न करत असतात. काहींच्या वाट्याला ही लाइमलाईट सहजासहजी येते तर काहींना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. अशाच एका वाईट अनुभवाबाबत एक अभिनेत्री खुलेपणाने बोलली आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अभिनेत्री ईशा गुप्ता आहे. ईशा गुप्ताने आपले हे अनुभव एका मुलाखतीत सांगितले आहेत.
'आश्रम 3' रिलीज होण्यापूर्वी बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता वेब सीरिजच्या प्रमोशनच्या कामात गुंतलीय. बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत तिने लाइमलाईटसाठी तिला काय काय कराव लागलं याची माहिती दिली.
ईशा गुप्ता म्हणाली, जेव्हा मी कोणतीही पोस्ट करते, तेव्हा मला ती आवडते. मी जेव्हा काहीही बोलते त्याची हेडलाईन बनते, पण माझं हेडलाईनमध्ये राहणे महत्त्वाचे आहे. लोक माझ्याबद्दल बोलतात हे माझ्यासाठी पुरेसे असल्याचे ती म्हणते.
मी काय कपडे घातले आहे, मी काय खात आहे आणि मी कशाबद्दल बोलत आहे हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. जोपर्यंत लोकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, तोपर्यंत त्यांना तुमच्यामध्ये रस आहे. लोकांनी मला विसरावे असे मला वाटत नाही. लोकांनी मला फक्त लक्षात ठेवावे असे मला वाटते. मग ते सेक्सी फोटो असो किंवा शो असो, प्रेक्षकांनी मला लक्षात ठेवावे असेच मला वाटत असल्याचे ती म्हणते.
बोल्ड फोटोवर काय म्हणाली ?
मी असे काही पोस्ट करत नाही जे शेअर करता येत नाही. जर मी काही सेक्सी फोटो शेअर केले तर माझ्या 4-5 पोस्ट प्रवास, फिटनेस आणि इतर गोष्टींशी संबंधित आहेत. ही ईशा गुप्ता आहे हे लोकांना कळावे अशी माझी इच्छा आहे, असे ईशा गुप्ता म्हणाली.