मुंबई :  'भगवान मैं... भगवान मेरा नाम...' असं म्हणणाऱ्या बाबा निराला'चं सत्य अखेर तिसऱ्या भागातून सर्वांसमोर येणार का?  असा प्रश्न ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांना पडत आहे. पण ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर फक्त आणि फक्त अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बोल्ड सीनची चर्चा रंगत आहे. सीरिजचा ट्रेलर समोर आल्यानंतर त्यात दिसणार्‍या नव्या चेहर्‍याची लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेलरनंतर ईशा तुफान चर्चेत आहे.  ईशा गुप्ताच्या  बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये ईशाचे 6 सीन आहेत ज्यात ती बाबा निराला म्हणजेच बॉबी देओलसोबत इंटिमेट करताना दिसत आहे.


गेल्या सीझनमध्ये बाबा निरालासोबत अभिनेत्री त्रिधा चौधरी ट्रेलरमध्ये झळकली होती. त्यामुळे तिसऱ्या सीरिजमध्ये देखील बाबा निराला आणि बिता यांचा रोमान्स पाहायला मिळेल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा होती, पण तसे झाले नाही. 



सध्या सोशल मीडियावर 'आश्रम 3'चा ट्रेलर तुफान व्हायरल होत आहे. सीरिज 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक देखील सीरिजच्या प्रतीक्षेत आहेत.


आश्रम वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली, की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. 


बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.