Aashram 3 Trailer: `खुलेगा बाबा का राझ, या होगा बाबा का राज...?`
ड्रग्ज, बलात्कार आणि राजकार... `बाबा निराला`चं काळ सत्य येणाक जगा समोर?
मुंबई : 'भगवान मैं... भगवान मेरा नाम...' असं म्हणणाऱ्या 'बाबा निराला'चं सत्य अखेर तिसऱ्या भागातून सर्वांसमोर येणार का? असा प्रश्न ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांना पडत आहे. 'सारे दुनिया को बाता दुंगी... बाबा की असलीयत...' असं म्हणणारी पम्मी म्हणजे अभिनेत्री अदिती पोहनकर... नक्की काय करेल ज्यामुळे बाबाचे काळे कृत्य संपूर्ण जगासमोर येईल... हे सीरिज प्रदर्शित झाल्यानंतरचं समोर येईल.
सीरिजमध्ये बाबा निरालाच्या भूमिकेला अभिनेता बॉबी देओलने न्याय दिला आहे. खुद्द बॉबी देओलने सीरिजचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. शिवाय त्याच्या कॅप्शनने सर्वांसमोर एक प्रश्न उपस्थित राहिला आहे.
ट्रेलर पोस्ट करत बॉबीने कॅप्शनमध्ये, 'बाबा निराला... स्वरूपी या बहरुपी... खुलेगा बाबा का राझ, या होगा बाबा का राज...' असं लिहिलं आहे. तर 'आश्रम 3' सीरिज 3 जून रोजी एमएक्सप्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.
आश्रम वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली, की तो लोकांच्या मनात घर करून गेली. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे.
बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.