Shah Rukh Khan And Suhana Khan Movie King: अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने 'द आर्चीज' या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.  2023 मध्ये शाहरुख खानचा 'पठाण' आणि 'जवान' हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. त्यानंतर आता शाहरुख खान त्याच्या आगामी 'किंग' या चित्रपटात लेक सुहानासोबत दिसणार आहे. तर सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील या चित्रपटात दिसणार आहे. अशातच आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. नुकताच या अभिनेत्याने हिट चित्रपट दिला आहे. 'किंग' या चित्रपटात हा अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 


कोण आहे तो अभिनेता? 


मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान, अभिषेक बच्चन आणि सुहाना खान यांच्या 'किंग' या चित्रपटात आता आणखी एक नाव जोडले गेले आहे. या चित्रपटासाठी अभिनेता अभय वर्माची निवड करण्यात आली आहे. चित्रपटात अभिनेता अभय वर्मा हा सुहाना खानसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 



अभिनेता अभय वर्माची 'मुंढ्या' चित्रपटातील अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट हिट देखील ठरला आहे. याचाच परिणाम त्याला मिळणाऱ्या नवीन ऑफर्सवरही दिसून येत आहे. शाहरुख खान आणि सुहाना खान यांच्या 'किंग'मध्ये त्याला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटात काम करण्यासाठी देखील तो खूप उत्सुक आहे. 


कोण आहे अभय वर्मा? 


अभय वर्मा याचा जन्म 27 जुलै 1998 मध्ये हरियाणातील पानिपत येथे झाला आहे. अभय वर्माने 'मर्जी' या टीव्ही शोमधून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्याने 'लिटिल थिंग्स' या वेब सीरिजमध्ये काम केलं. आता तो लोकप्रिय वेब सीरिज 'द फॅमिली मॅन 2' मधून प्रसिद्ध झाला आहे.